शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भयमुक्त शहरसाठी गुन्ह्यांच्या तपासावर भर : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:50 IST

गुन्हेगारांवर कारवाईला प्राधान्य

पिंपरी : शहराला भयमुक्त करण्यासाठी गुन्यांई च्या तपासावर भर देण्यात येत आहे. त्यातून गुन्हे उघडकीस येऊन गुन्हेगारांवर कारवाई होईल. त्याला प्राधान्य असून, यातून गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत चाकण विभागासाठी सहायक पोलीस आयुक्त यांच्यासाठी च-होली फाटा नवीन कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले. त्याच्या कोनशिलेचे अनावरण कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २३) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहायक आयुक्त राम जाधव, डॉ. सागर कवडे उपस्थित होते.

चाकण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राम जाधव यांनी १६ एन्काउंटर करून अट्टल गुन्हेगारांना ‘यमसदनी’ पाठवले आहे. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करून कृष्ण प्रकाश म्हणाले, तशी कामगिरी आता होणे अपेक्षित आहे. त्यातून गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होईल. एक आस्थापना म्हणून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन आहे. त्यामुळे या आयुक्तालयांतर्गत नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक उपक्रम राबविणे आवश्यक आहे.  

आयुक्तांनी सहायक आयुक्तांना दिला ‘मान’  सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कोनशिलेचे अनावरण आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले. त्यानंतर सहायक आयुक्त राम जाधव यांना फित कापण्यास सांगून आयुक्तांनी त्यांना ‘मान’ दिला. तसेच कार्यालय प्रमुख म्हणून खुर्चीत तुम्हीच बसा, असा आग्रह देखील आयुक्तांनी केल्याने राम जाधव यांनी खुर्चीत बसून आयुक्तांचा सन्मान स्वीकारला. याच नवीन इमारतीत च-होली पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या हस्ते फित कापून चौकी कार्यान्वित करण्यात आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcharholiचऱ्होलीPoliceपोलिसcommissionerआयुक्त