शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोड परिसरासह  किवळे -विकासनगर भागात बत्ती गुल ; उकाड्याने नागरिक हैराण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 11:29 IST

वादळी पाऊस पडला एक तास मात्र वीज पुरवठा पहिल्या दिवशी चार तास व दुसऱ्या दिवशी सलग दहा तास खंडित..

ठळक मुद्देकिवळे ,विकासनगर परिसर तसेच देहूरोड, चिंचोली, किन्हईसह विविध भागात वादळी पाऊस

किवळे  : उच्च दाब वाहिनीत बिघाड झाल्याने महावितरणकडून विकासनगर -किवळे , देहूरोड परिसरातील चिंचोली , किन्हई ,झेंडेमळा परिसरात गुरुवारी चार तास व व शुक्रवारी  सलग दहा तास वीज पुरवठा खंडित झाला होता.  गुरुवारी व शुक्रवारी रात्री साडेअकरापर्यंत या भागातील नागरिकांसह लहान मुलांना व वृद्धांना उकाड्याने अक्षरशः हैराण झाले  होते. वादळी पाऊस गुरुवारी सायंकाळी एक तास पडला मात्र, वीज पुरवठा पहिल्या दिवशी चार तास व दुसऱ्या दिवशी सलग दहा तास खंडित झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

     किवळे - विकासनगर  परिसरात तसेच देहूरोड परिसरातील चिंचोली, किन्हईसह विविध भागात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास वादळी पाऊस सुरु झाल्यानंतर वीज पुरवठा खंडीत  झाला होता. गुरुवारी सायंकाळी सुमारे तासभर वादळी वाऱ्यासह  पाऊस पडला मात्र गुरुवारी रात्री साडेअकरा व शुक्रवारी दुपारपासून रात्री साडेअकरापर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत सोशल  मीडियावर नाराजी व्यक्त केली . वीज पुरवठा खंडित झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या लहान मुले व वृद्धांसह सर्व नागरिकांना विविध समस्यांना समोर जावे लागले. दूरचित्रवाणी संच , पंखे बंद असल्याने सर्वच घटक त्रस्त झाले होते. लॉकडाऊनमुळे अगोदरच घरात बसून वैतागलेल्या लहान मुलांना समजावणे पालकांना कठीण जात होते.  

      शुक्रवारी सकाळी वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता.दुपारी दीडच्या सुमारास खंडित झालेल्या वीज पुरवठा रात्री साडे अकराच्या सुमारास सुरळीत झाल्याने नागरिकांची उकाड्याने झालेली घालमेल थांबली. दरम्यान उंच इमारतीत असलेली उदवाहक यंत्रे ( लिफ्ट )बंद असल्याने जेष्टाचें खूप हाल झाले. जमिनीतील पाण्याच्या टाकीतील पाणी इमारतीच्या वरच्या टाकीत पाणी चढविण्यात न आल्याने विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. अखेर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान देहूरोड भागात वीज पुरवठा करणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीत देहूजवळ तसेच किवळे- विकासनगर भागाला वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीत रावेत येथे बिघाड झाल्याचे महावितरणच्या अभियंत्यांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :kiwaleकिवळेRainपाऊसmahavitaranमहावितरण