शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा महापालिका कामकाजावर परिणाम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 12:08 IST

सर्वसाधारण सभा आणि स्थायी समिती सभेला केवळ सहा अधिकारी आणि प्रमुख नगरसेवकांची हजेरी होती. यावेळी सत्तर टक्के नगरसेवक अनुपस्थित होते.

ठळक मुद्देमनोहर पर्रिकर, नगरसेविका सुलक्षणा धर यांच्या मुलाला सभेत श्रद्धांजली

पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कामकाजावर परिणाम पडला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी नियुक्त केले आहे. याचा परिणाम सर्वसाधारण सभा आणि स्थायी समिती सभेत जाणवला. सर्वसाधारण सभेला केवळ सहा अधिकारी आणि प्रमुख नगरसेवकांची हजेरी होती. सत्तर टक्के नगरसेवक यावेळी अनुपस्थित होते. काहीनगरसेवकांनी केवळ हजेरी लावून पळ काढण्यात धन्यता मानली. महापालिका सभा पुढील महिन्यांच्या २० एप्रिलपर्यंत तहकूब केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेची मार्च महिन्याची सभा होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा धर यांच्या मुलाला सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी महापौर राहुल जाधव म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ता अशी शेवटपर्यंत मनोहर पर्रिकर यांची ओळख होती. मुख्यमंत्री, देशाचा संरक्षणमंत्री अशी मोठी पदे भुषविली. तरीही त्यांच्यातील कार्यकर्ता जिवंत होता. साध्या मानसांमध्ये मिसळण्याचा त्यांचा गुण कौतुकास्पद होता. साधी राहणी उच्च विचारसरणी याप्रमाणे ते राहिले. त्यांच्या जाण्याचे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व हरपले आहे. विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील रेडझोन, बोपखेल पुलासह संरक्षण विभागासंदर्भातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पर्रिकर यांनी प्रयत्न केले. राजकीय वलय असले तरी मनोहर पर्रिकर शेवटपर्यंत सामान्य कार्यकर्ता जगले. संरक्षणमंत्री असताना त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील पश्नांबाबत आग्रही भूमिका घेतली होती. पर्रिकर यांच्या जाण्याने चांगल्या राजकीय कार्यकर्त्यांची हानी झाली आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री असे उत्तृंग यश मनोहर पर्रिकर यांनी मिळविले. मुख्यमंत्री असतानाही त्यांचे पाय जमिनीवर होते. प्रश्नांची जाणीव असणारा हा नेता होता. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपले साधेपणा सोडला नाही. कार्यकर्त्यांत मिळून मिसळून राहायला त्यांना आवडत असे. त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीकोन होता. अमेठीतील निवडणूकीत त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रसंग आला. त्यांच्यातील साधेपणा हाच मला खूप भावला होता. कोणताही अभिनिवेष त्यांच्या ठायी दिसून आला नाही. माणुसपण जपणारा नेता होता. त्यांच्या जाण्याचे भाजपची हानी झाली आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड