शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:36 IST

चाकण पोलीसांची कारवाई : आरोपींकडून जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस

चाकण : पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत एका संशयित इंडिका कारचा सिनेस्टाइलने पाठलाग करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोन आरोपींना चाकण पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. यातील तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव बापू राऊत (वय २०), अविनाश प्रकाश शिंदे (वय २४, दोघेही सध्या रा. चिखली, ता.हवेली, जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी निघोजे येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पकडले.११ तारखेला सायंकाळी निघोजे व शिंदे वासुली येथे चाकण पोलिसांनी नाकाबंदी केली असता एक पिवळ्या नंबर प्लेटची संशयित मोटार ही नाकाबंदी पाहून उलट दिशेने पळून गेली. यावेळी नाकाबंदीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी ही माहिती ग्रुपवर टाकली. यावेळी सहाय्यक निरीक्षक जगदाळे यांना इंदुरी ते सुदुंबरे रस्त्याने गाडी भरधाव वेगात जाताना दिसली. या गाडीचा पाठलाग करीत असताना वासुली गावच्या हद्दीत मोटार एनडीआरएफ च्या जवळील एका कंपनीच्या भिंतीला धडकली. त्यातील पाच आरोपी पळून जात असताना त्यापैकी वैभव व अविनाश यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले व इतर तीनजण पळून गेले.या कारमधून लोखंडी कोयता, एक सुरा, एक लोखंडी रॉड, व प्रवीण ढाले नावाचे एटीएम कार्ड, पिवळ्या रंगाची खरी असलेली नंबर प्लेट (एम एच १४ सी एक्स २८१३), दारूच्या बाटल्या, मोबाईल, मास्क, असा २ लाख ८ हजार ४५० रुपये किंमतीचा माल मिळून आला. या गाडीच्या मालकाने गाडी वैभव यास दरमहा वीस हजार रुपये भाड्याने दिली होती. या गाडीत प्रवाशांना बसवून त्यांना कोयता व चाकूचा धाक दाखवून मारहाण करून लूटमार करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नीलपत्रेवार हे पुढील तपास करीत आहेत.यापूर्वी या आरोपींना मुकेश राठोड व त्यांची पत्नी यांना लिफ्ट देऊन पत्नीच्या गळ्यातील दागिने, मोबाईल असा ९८ हजाराचा माल चोरून नेल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. तसेच बिपीन कुमार दुबे (सध्या रा. भांबोली, ता.खेड, जि.पुणे ) व जितेंद्र शामलाल दोहारे (रा. लोणावळा, ता.मावळ, जि.पुणे) यांना गाडीत लिफ्ट देऊन त्यांचे एटीएम कार्ड घेऊन त्यांचा पिन नंबर घेऊन भोसरी, निगडी, मोशी या भागातून एटीएम सेंटरमधून रोख रक्कम जबरीने काढून घेतली. याचीही आरोपींनी कबुली दिली आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड