शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

उन्हामुळे त्वचारुग्णांमध्ये होतेय मोठ्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 02:43 IST

सध्या मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा चांगलाच चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे आजारांमध्येही वाढ झाली आहे.

पिंपरी : उन्हाळा सुरू झाला की त्वचारुग्णांमध्ये वाढ होते. सध्या मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा चांगलाच चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे आजारांमध्येही वाढ झाली आहे. रुग्णालयातील १००पैकी सरासरी ४० ते ५० रुग्णांना त्वचेच्या विविध आजारांनी ग्रासले आहे.अनुभवी त्वचारोग तज्ज्ञाकडून उपचार न केल्यास गजकर्ण पसरण्याची शक्यता असते. नागरिकांना सर्वांत जास्त जांघेत खाजेचा त्रास असतो. यावर त्वरित उपचार न केल्यास आजार वाढत जातो. त्वचेवर लाल चट्टे पडतात. तसेच हातांच्या बोटांवरही काळपटपणा येतो. त्वचारोग झाल्यास अनेकदा स्टेरॉइडमिश्रित मलमचा वापर रुग्ण प्राथमिक स्वरूपात करतात. तज्ज्ञांच्या मते त्या क्रीमचा वापर टाळायला हवा.त्वचारोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ४० ते ५० रुग्ण फंगल इन्फेक्शनने बाधित असतात. उन्हाळ्यामध्ये ही आकडेवारी आणखी वाढते. अनेक रुग्ण उपचार म्हणून मेडिकलमधून स्टेरॉइडमिश्रित क्रीम वापरतात. मात्र तो घातक ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.या आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. उपचार सुरू केल्यानंतर त्यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे. सातत्याने उपचार घेतला की हा आजार लवकर बरा होतो. उन्हाळ्यामध्ये शरीराला जास्त घाम येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.- डॉ. सुनील जॉन, त्वचारोगतज्ज्ञ,तालेरा रुग्णालयत्वचाविकाराची लक्षणेत्वचारोगामुळे शरीरावर लालसर, खाजविणारे चट्टे येऊन ते गोल पसरत जातात. त्याला गजकर्ण असेही म्हणतात. ते नेहमी छातीवर, जांघेत, बगलेत आढळून येतात. गजकर्ण शरीरावर डोक्यापासून नखापर्यंत कोठेही होऊ शकते.त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यानियमित आंघोळ करावी. ओले कपडे घालू नयेत. बाधित व्यक्तीचे कपडे, टॉवेल, चादर, कंगवा, साबण वापरू नये. सुती व सैैल कपडे वापरावेत. शरीरावर कुठे खाज येत असेल, तर त्वरित त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.स्टेरॉइडमिश्रित क्रीमचे दुष्परिणामपूर्वी गजकर्ण एखाद्या गोळीनेही बरे होत होते. आता अनेक दिवस उपचार घेऊनही गजकर्ण बरे होत नाही. अशा प्रकारच्या स्टेरॉइडमिश्रित क्रीमचा अतिवापर केल्याने गजकर्णच्या कारक फंगसमध्ये प्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे आढळून आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्य