शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मुंढे न आल्यामुळे उद्योगनगरीचे प्राधिकरण कारभा-याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:47 IST

पिंपरी : उद्योगनगरीतील पीएमपी वाहतूक प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार बोलावूनही अध्यक्ष तुकाराम मुंढे हे महापालिकेत आलेले नाहीत.

पिंपरी : उद्योगनगरीतील पीएमपी वाहतूक प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार बोलावूनही अध्यक्ष तुकाराम मुंढे हे महापालिकेत आलेले नाहीत. तसेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शासनाने सोपवून एक महिना झाला. तरीही ते रुजू झालेले नसल्याने उद्योगनगरीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.पुण्यातील महापालिकेतील सर्वसाधारण सभेतून पीएमपी अध्यक्ष तुकाराम मुंढे निघून गेले. अत्यंत कार्यक्षम अशी त्यांची ओळख असली, तरी उद्योगनगरीच्या प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना अद्याप वेळ मिळालेला नाही. पिंपरी महापालिका पीएमपीला एकूण खर्चापैकी ४० टक्के रक्कम देते. मात्र, त्या तुलनेत शहराला सुविधा मिळत नाहीत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीच्या कर्मचा-यांच्या बदल्या पुण्यात केल्या आहेत आणि पुण्यातील कर्मचा-यांच्या पिंपरीला. संचयन तुटीचे कारण दाखवून पिंपरीतील अनेक मार्ग बंद केले आहेत. पुणे-मुंबई महामार्ग सोडला, तर शहरातील अंतर्गत भागातील बस वाहतूक कोलमडली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात जुन्या गाड्या पाठविल्या जात असल्याने रस्त्यावरच बंद पडून प्रवाशांची गैरसोय होण्याच्या घटना वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांचे बस पास आणि गाड्या वेळेवर न येण्याच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत. तुकाराम मुंडे यांनी प्राधिरणाचा पदभार स्वीकारला असता, तर त्यांना इथले प्रश्न सोडविता आले असते.मुंढेंची नियुक्ती झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांचे प्रश्न सुटतील आणि नागरिकांना चांगली प्रवासी वाहतूक मिळेल, अशी आशा होती. मात्र, गेल्या काही महिन्यांत वाहतूक सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. काही कालखंड महापालिकेने निधी अडविण्याचाही प्रयत्न केला होता. नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने महापालिकेचे महापौर नितीन काळजे आणि स्थायी समितीचे सभापती सीमा सावळे यांनी मुंढे यांना महापालिकेत बोलावले होते.>शहरातील संस्थांचे कार्यक्रम व व्याख्याने यासाठी मुंढे यांना वेळ मिळतो. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीच्या बस वाहतुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ नाही. महापालिकेने तीन वेळा पत्र दिले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही विनंती केली आहे. मात्र, मुंढे यांनी प्रश्न जाणून घेण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि नागरिकांकडून टीकेची झोड उठविली जात आहे.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड