शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपामध्ये एकमत न झाल्याने विषय समिती सदस्य आणि सभापती पदाची निवड लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 13:28 IST

पिंपरी महापालिकेतील सत्ताधारी भाजपात नावाबाबत एकमत न झाल्याने ही निवड लांबणीवर पडणार..

ठळक मुद्देपालिका विषय समित्यांची निर्मिती होणार

पिंपरी : मुदत संपल्याने  बरखास्त झालेल्या महापालिकेतील विषय समित्यांची निवड केली जाणार आहे. पाच समित्यांमधील सदस्यांची निवड मंगळवारी सर्वसाधारण सभेत होणार होती, मात्र नावाबत भाजपामध्ये एकमत न झाल्याने सदस्य आणि सभापती पदाची निवड लांबणीवर पडली आहे.

कोरोनाकाळात राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विषय समित्यांची निवडणूक घेण्यास मनाई केली होती. महापालिकेतील विषय समित्यांची मुदत १४ जून रोजी संपली. त्यानंतर समित्या बरखास्त झाल्या होत्या. आता व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ऑनलाईन निवडणूक घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे पालिका विषय समित्यांची निर्मिती होणार आहे.

महापालिकेची स्थायी समिती सर्वांत महत्वाची समिती असते. शहरातील विकास कामांबाबतचे सर्व निर्णय ही समिती घेत असते. या समितीचे अध्यक्ष व नवीन सदस्यांची निवड फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यामुळे ती कार्यरत आहे; मात्र विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, कला-क्रीडा व सांस्कृतिक आणि शिक्षण समित्या बरखास्त झाल्या होत्या.  सध्या या समित्यांचे अधिकार सर्वसाधारण सभेकडे आहेत.निवडणूक घेण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे समित्यांची नियुक्ती केली जाणार आहे. ऑक्‍टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा आज झाली. या सभेत नवीन सदस्यांची निवड केली जाणार होती. मात्र सत्ताधारी भाजपात नावाबाबत एकमत न झाल्याने ही निवड लांबणीवर पडणार आहे.............प्रत्येक विषय समितीवर नऊ सदस्य आहेत.  सभागृहातील संख्याबळानुसार नऊ सदस्यांमध्ये भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य असेल. त्या-त्या पक्षाच्या सदस्यांची नावे संबंधित पक्षाचे गटनेते सर्वसाधारण सभेत महापौरांकडे सादर करतात. त्यानंतर सदस्यांच्या नावाची घोषणा केली जाते. यात सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना कोणाला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाElectionनिवडणूक