शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

ठेकेदारामुळे नागरिकांच्या घशाला कोरड

By admin | Updated: April 19, 2016 01:00 IST

पिंपरी-चिंचवड शहरात अगोदरच १५ टक्के कपात आहे. त्यातच दोन दिवसांपासून शहराच्या अनेक भागात पाणीच आले नसल्याने आणखीणच ओरड वाढली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अगोदरच १५ टक्के कपात आहे. त्यातच दोन दिवसांपासून शहराच्या अनेक भागात पाणीच आले नसल्याने आणखीणच ओरड वाढली. देहूरोड-कात्रज मार्गावरील नदीवर पूल बांधणाऱ्या ठेकेदाराने कोणाचीही परवानगी न घेता नदीत बांध टाकला. यामुळे पाणी अडल्याने रावेतमधील जलउपसा केंद्रापर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. विशेष म्हणजे या बांधाबाबत पाटबंधारे विभागाला माहिती नव्हती, की महापालिकेला कल्पना नव्हती. त्यामुळे अगोदरच पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या शहरवासीयांना गेले दोन दिवस पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. पिंपरी-चिंचवड शहराला पवना नदीतून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी रावेत येथे बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्याजवळ महापालिकेने जलउपसा केंद्र उभारले आहे. बंधाऱ्यातून पाण्याचा उपसा केल्यानंतर निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर शहराच्या विविध भागात जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. (प्रतिनिधी)४शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सध्या केवळ तीस टक्के पाणीसाठा आहे. यामुळे शहरात पंधरा टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. दिवसातून एक वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना शहरवासीयांना कसरत करावी लागत आहे. अशातच शनिवार, रविवार आणि सोमवारी सकाळी एकवेळदेखील पाणीपुरवठा झाला नाही. संपूर्ण शहरात पाण्याबाबत ओरड सुरू झाली. नागरिक नगरसेवकांकडे विचारणा करीत होते. तर नगरसेवक अधिकाऱ्यांकडे विचारणा करीत होते. आमच्या भागात पाणी आले नाही, अशी तक्रार नगरसेवक अधिकाऱ्यांकडे करीत होते. ४याबाबत सोमवारी रावेत येथील जलउपसा केंद्र येथे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. पाणीटंचाई कशामुळे निर्माण झाली, यावर चर्चा करण्यात आली. जलउपसा केंद्रापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली. त्यांच्याकडून नेहमीप्रमाणे पवना धरणातून पाणी सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर धरणातून पाणी सोडले असतानाही जलउपसा केंद्रापर्यंत पोहोचले नसल्याचे समोर आले. धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यापर्यंत का येत नाही, याचा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध सुरू केला. रावेत येथील बंधाऱ्यापासून वरील बाजूस पाहणी केली. त्यामध्ये पुनावळेजवळील पुलाजवळ मातीचा बांध घातल्याचे निदर्शनास आले. पुलाच्या कामासाठी पुनावळेजवळील नदीपात्रात बांध घालून पाणी अडविण्याबाबतची कसलीही कल्पना महापालिका तसेच पाटबंधारे विभागाला देण्यात आली नव्हती. या बांधामुळे जलउपसा केंद्रापर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नव्हते. त्यामुळे पाण्याचा उपसा कमी प्रमाणात होत होता. त्याचा परिणाम शहरातील पाणी वितरणावर झाला. आता हा बांध हटविण्यात आला असून, मंगळवार सकाळपासून सुरळीत पाणीपुरवठा होईल. - प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, पिं.चिं. मनपा