शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दस-यानिमित्त आपट्याचे पान म्हणून भलत्याच पानाची होतेय विक्री, आंब्याची डहाळीही झाली महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 14:45 IST

शहरात आंब्याच्या छोट्या डहाळीसाठी दहा रुपये मोजावे लागताहेत. तर आपट्याच्या पानासारखी दिसणारी अन्य वृक्षांची पाने आपट्याची पाने म्हणून गेल्या काही वर्षांपासून सर्रासपणे बाजारपेठेत विक्री होत आहेत.

पिंपरी चिंचवड : सण, उत्सव काळात शहरात मातीपासून वृक्षांच्या पानांचीही विक्री होऊ लागली आहे. ग्रामीण भागात घराला तोरण बांधण्यासाठी आवश्यक असणारी आंब्याच्या वृक्षाची पाने सहज कोठेही उपलब्ध होतात. कोणाच्याही शेताच्या बांधावरील आंब्याच्या वृक्षाची पाने कोणीही घेऊन येते. शहरात मात्र आंब्याच्या छोट्या डहाळीसाठी दहा रुपये मोजावे लागताहेत. सध्या नवरात्रौत्सवाचा काळ आहे. नवरात्रौत्सवाच्या सुरुवातीस पहिल्याच माळेच्या अगोदर घटस्थापनेसाठी लागणारी माती पिंपरीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होती. छोट्या आकारातील घमेलेभर मातीसाठी २५ रुपये मोजावे लागले. मातीसुद्धा विकत घेण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. घराच्या तोरणासाठी आवश्यक असणारी आंब्यांची पानेसुद्धा पाच ते दहा रुपये देऊन विकत घ्यावी लागताहेत. बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा पूजेचे साहित्य विक्रीस घेऊन बसलेल्यांकडे आंब्याची पाने मिळत आहेत. दस-याच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने सोन्याची लूट अर्थात आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. त्यामुळे आपट्याची पाने मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत विक्रीस आणल्याचे पाहावयास मिळते. आपट्याच्या पानांसाठीही दहा रुपये खर्च करणे भाग पडते. बनवेगिरीआपट्याच्या पानासारखी दिसणारी अन्य वृक्षांची पाने आपट्याची पाने म्हणून गेल्या काही वर्षांपासून सर्रासपणे बाजारपेठेत विक्री होत आहेत. पैसे देऊनही आपट्याची पाने मिळत नाहीत. आपट्याची पाने म्हणून दुसरीच पाने दिली जातात. उत्सवातील पारंपरिक प्रथांचे पालन करतानाही बनवेगिरीला सामोरे जावे लागत असल्याची खंत नागरिक व्यक्त करतात. 

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७