शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वायसीएमएचच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश वाबळे यांची नियुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 16:46 IST

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरु केल्या जाणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अधिष्ठाता पदाची नेमणूक करणे आवश्यक होते.

पिंपरी : पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थेच्या प्रशासकीय कामकाजासाठी अधिष्ठातापदी प्रतिनियुक्तीवर आलेले डॉ. पद्माकर पंडित यांच्याकडून अधिष्ठातापदाचा कार्यभार काढून घेतला असून मानधन तत्वावरील डॉ. राजेंद्र वाबळे यांची नियुक्ती केली आहे.      महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरु केल्या जाणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अधिष्ठाता पदाची नेमणूक करणे आवश्यक होते. त्याकरिता राज्य शासन सेवेतील डॉ. पद्माकर पंडीत यांची या पदावर वर्णी लावण्यात आली होती. त्यानंतर त्यांना या पदावर मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, त्यापुर्वी मानधन तत्त्वावर अधिष्ठाता पद भरण्याबाबत महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यावेळी मुलाखत घेऊन, डॉ. वाबळे यांची या पदाकरिता निवड करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी ते रुजू न झाल्याने या पदावर डॉ. पंडीत हेच कार्यरत होते. दरम्यान, डॉ. वाबळे यांनी या पदावर रुजू होण्याची तयारी दर्शविल्याने अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी ३ मे रोजी अधिष्ठाता पदाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपविला आहे. तर महापालिका वैद्यकीय विभागप्रमुख आणि विशेष कार्य अधिकारी पदाचा कार्यभार डॉ. पंडीत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटल