शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

औद्योगिक विकासाला खोडा, बीआरटी कॉरिडॉर नियम बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 2:34 AM

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बीआरटी कॉरिडॉरसाठी असणाऱ्या नियमावलीत फेरबदल केले आहेत. फेरबदलाची अधिसूचना प्रसिद्ध केली असून त्यावर सूचना आणि हरकती मागविल्या आहेत.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बीआरटी कॉरिडॉरसाठी असणाऱ्या नियमावलीत फेरबदल केले आहेत. फेरबदलाची अधिसूचना प्रसिद्ध केली असून त्यावर सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. वाहतुकीचे कारण देऊन बीआरटी कॉरीडॉरमध्ये दोनशे मीटर अंतरात कार शोरूम, व्यापारी संकुलांना बंदी घातली आहे. औद्योगिक विकास आणि मेक इन इंडिया... असे केंद्र शासनाचे धोरण असताना ‘व्यावसायिक उपक्रमांना बंदी घालण्याचा अजब निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे.त्यास शहरातील सुज्ञ नागरिकांनी आक्षेप घेतला आहे.विकास योजना नियमावली सुधारित करण्याचे कार्यवाही सुरू आहे. महाराष्टÑ प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ कलम ३७ (१ क) अन्वये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीमधील बीआरटी कॉरीडॉर संबंधीचा नियम क्र. एऩ २.५ मध्ये फेरबदलाची प्रक्रिया सुरू केली होती. राज्य शासनाच्या नगररचना विभागाने विकास नियमावलीबाबत सल्ला-मसलत करून जनहिताच्या दृष्टीने बदलांसह मंजूर करणे आवश्यक आहे, असे आदेशात म्हटले होते. त्यानुसार यासंदर्भातील अधिसूचना जारी करून सूचना आणि हरकतीची कार्यवाही सुरू केली होती.बीआरटी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना व्यावसायिक व्यापारी संकुले उभारण्याबाबत काही नियम घालून दिले होते. शंभर मीटर दुतर्फा उभारण्यात येणाºया प्रकल्पांना चटई निर्देशांक आणि टीडीआर लोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्या बदल्यात २५ टक्के जागा सोडावी लागत होती. बीआरटीतील रस्त्यालगतच्या दोनशे मीटरच्या परिसरासाठी असणाºया नियमावलीत बदल केला आहे.बीआरटी किंवा मेट्रो या मार्गावर पादचारी सुविधा अधिक असल्याने व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळते. त्यामुळे कार शोरूम, सर्व्हिसिंग सेंटर अशा दालनांना बंदी घालणे चुकीचे आहे़ नागरिकांना सुविधा मिळणे आणि गैरसोय टाळण्यासाठी नियोजित व्यावसायिक प्रकल्पांची बंदी मागे घ्यावी, सर्वच व्यावसायिक उपक्रमांना परवानगी द्यावी, अशी मागणी नंदकुमार भटेवरा आणि दिनेश मेहेर यांनीकेली आहे.नागरिकांचीही गैरसोय : आर्थिक ताण येणारबीआरटी कॉरिडॉरच्या दोनशे मीटरमध्ये कार शोरूम, व्यापारी संकुलांना बंदी घातली आहे. त्यामुळे अशा दालनात जाण्यासाठी नागरिकांना बीआरटी किंवा मेट्रोत येऊन रस्त्यावर उतरून रिक्षा करून शोरूमचा शोध घ्यावा लागणार आहे. तसेच आतील अरूंद रस्त्यावर कंटेनर नेणेही अवघड होणार आहे. वाहतूक प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर होणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय तर होणारच आहे. त्याचबरोबर आर्थिक फटकाही बसणार आहेत. शासनाने निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी सजग नागरिकांनी केली आहे.वाहतूककोंडीचे कारण देऊन बदलबीआरटी रस्त्यालगतच्या दोनशे मीटरच्या परिसरात महापालिकेला मिळणाºया जागांचा उपयोग बहुउद्देशीय पार्किंगसाठी केला जात होता. कॉरीडॉरमध्ये यापूर्वी होलसेल दुकाने, व्यापारी संकुले, कार डिलर, गोदामे, आॅटो गॅरेज यांना परवानगी होती. मात्र, सुधारित नियमात होलसेल दुकाने, व्यापारी संकुले, कार डिलर, गोदामे, आॅटो गॅरेज यांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे नवीन रस्त्यावर आता ठरावीक व्यवसायाची दालने उभारण्यास बंदी घातली आहे.मुख्यमंत्र्यांना साकडे; अजब निर्णयाला आक्षेपबीआरटी कॉरीडॉरमध्ये दोनशे मीटर अंतरात कार शोरूम, व्यापारी संकुलांना बंदी घातली आहे. या अजब निर्णयास सुज्ञ नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर सूचना आणि हकरती दाखल झाल्या आहेत. सुज्ञ नागरिक नंदकुमार भटेवरा आणि दिनेश मेहेर यांनी या निर्णयाला आक्षेप घेतला आहे, नागरी गरजांकडे पाहता बीआरटी मार्गावर बंदी घालणे चुकीचे आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान सचिव, नगर नियोजन विभागाच्या संचालकांना निवेदन दिले.प्रगत देशांमध्ये व्यावसायिक उपक्रमांना प्राधान्यप्रगत देशांमध्ये व्यावसायिक उपक्रमांना पहिले स्थान दिले आहे. मेट्रो किंवा बीआरटी अशा मार्गालगत व्यावसायिक उपक्रमांना स्थान आहे. सिंगापूरमधील मरीना बे, आॅर्चर्ड, हार्बर फ्रंट, क्लार्क क्वे, रॅफल्स प्लेस, एक उत्तर, एस्प्लानेड आणि दुबईतील भूर्ज खलिफा, दुबई मॉल, मॉल आॅफ द अमिरात, बिझिनेस बे, फायनान्शियल सेंटर, वर्ल्ड ट्रेड सेंटर, थायलंडमधील सियाम आणि मलेशियातील बुकीत बिंटांग, चीन आणि हाँगकाँगमधेही व्यावसायिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. या उलट धोरण राज्याचे आहे.कृती आराखडा करण्याच्या सूचनाबीआरटी कॉरिडॉरच्या दुतर्फा दोनशे मीटर परिसरात सुनियोजितपणे विकास करावा, अशा सूचना नगरविकास विभागाने महापालिकांना केल्या आहेत. त्याचा कृ ती आराखडा करावा, असेही आदेशात म्हटले आहे. तसेच बीआरटी मार्गातील ग्रेडसेपरेटर, पादचारी मार्ग यावर अपघात होऊ नयेत, याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच वाहतूक घनतेची गणना करून सेवा मार्ग, समतल विलगक करावेत, ट्रॅफिक वॉर्डनकडून वाहतूक नियमनासाठी प्रयत्न करावेत़ एकात्मिक वाहतूक आराखडा करावा, अशाही सूचना केल्या आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या