शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला देशात हुकूमशाही वातावरण आणायचे का? आदित्य ठाकरे यांचा सवाल

By विश्वास मोरे | Updated: February 26, 2024 00:11 IST

ताथवडे येथे पत्रकारांशी बोलताना उपस्थित केले विविध प्रश्न

विश्वास मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कोणी दिले, गृहमंत्र्यांनी कि मुख्यमंत्र्यानी हे तपासायला हवे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे होते मग, लाठीचार्ज कशासाठी केला. आता दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. शेतकरी सीमेवर आहेत. तर, मनोज जरांगे मुबंईला निघालेत. जे लोक आंदोलन करतात त्यांचे ऐकून तर घ्यायला हवे. भाजपाला देशात हुकूमशाही वातावरण आणण्याचे का? असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ताथवडे येथे पत्रकारांशी बोलताना केला.

 आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी शहरप्रमुख सचिन भोसले, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन आहेर, संघटक संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, ज्येष्ठ नेते एकनाथ पवार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे उपस्थित होते. ...  महाराष्ट्राला मागे नेवून मिळवायचे काय? भाजपावर टीका करताना ठाकरे म्हणाले, 'भाजपने जाती- जातीत आणि धर्मा-धर्मात विष पेरण्याचे काम सुरु ठेवले आहे. जाती-जातीत राजकारण केले जात आहे. राजकारणाचा चोथा केला आहे. सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची गरज आहे. वातावरण दूषित केले जात आहे. मात्र, ते होणार नाही. देशापुढे महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्राला मागे नेवून मिळवायचे काय आहे.' ... चौकशी झाली पाहिजे मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत, यावर आपले मत काय? यावर ठाकरे म्हणाले, 'मला देखील तुमच्या माध्यमातून कळाले. मी जास्त बोलणार नाही थोड स्पष्ट होऊ द्या. जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कोणी दिले ? याची चौकशी झाली पाहिजे.' नितेश राणे राणे यांच्या टीकेवर विचारले असता ठाकरे म्हणाले, 'अश्या लोकांवर मी बोलत नाही, अन्यथा माझी लेव्हल खाली जाईल.' ... उमेदवार हे केवळ उद्धव ठाकरे ठरवतीलमावळची उमेदवारी ठरली आहे का? यावर ठाकरे म्हणाले, 'वाघेरे यांनी चांगले नियोजन केले. मावळ लोकसभा उमेदवार कोण असेल, हे केवळ उद्धव ठाकरे ठरवतील.''  ..... मकाऊचा वेगळा अर्थ काढू नकाछोटे पक्ष संपवा, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. त्यावर आपण त्यांचा आणि चायनाचा संबंध आहे, अशी टीका केली?  या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, त्यांचा आणि चायनाच्या जवळचा सबंध आहे. पण, तुम्ही गैरसमज करू नका, मी मकाऊबद्दल बोलत नाही. चायनामध्ये जशी लोकशाही आहे, तशी त्यांना भारतात आणायची आहे. म्हणजे लोकशाही संपवून टाकायची आहे. बाकी तुम्ही मकाऊचा वेगळा अर्थ काढू नका.'

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेBJPभाजपा