शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत 'वायसीएम' रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांचे आंदोलन; विद्यावेतन वाढीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 13:22 IST

मुंबई महापालिकेप्रमाणे आम्हाला विद्यावेतन वाढ द्यावी अशी डॉक्टरांनी केली आहे मागणी

ठळक मुद्देकोरोना साथीच्या परिस्थितीमध्ये संसर्ग होऊन जीवाला धोका होण्याची जास्त भीती

पिंपरी: कोरोना विरोधात लढणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील सीपीएस निवासी डॉक्टरांनी विद्यावेतन वाढ मिळावी यासाठी  सोमवारी रुग्णालयासमोर आंदोलन केले. आम्ही जीवावर उदार होऊन कोरोनाविरोधात लढत आहोत. आम्हाला तुटपुंजे मानधन दिले जाते. मुंबई महापालिकेप्रमाणे आम्हाला विद्यावेतन वाढ द्यावी अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. तसेच महापालिका प्रशासन विद्यावेतन वाढ देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.  

पिंपरी चिंचवड महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविडसाठी समर्पित आहे.  रुग्णालयातील सीपीएस निवासी डॉक्टर चोवीस तास प्रामाणिकपणे आपली सेवा देत आहेत. या 33 डॉक्टरांना ऑगस्ट 2018 पासून 24 हजार 800 रुपये तुटपुंजे विद्यावेतन मिळत आहे.  सध्या कोरोना साथीच्या परिस्थितीमध्ये संसर्ग होऊन जीवाला धोका होण्याची जास्त भीती आहे. तरीही, जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. विद्यावेतन कमी मिळत असल्याने शहरात राहणे कठीण बनले आहे.या डॉक्टरांनी सातत्याने विद्यावेतन वाढ करण्याची मागणी केली. परंतु, महापालिका प्रशासन वाढ करण्यास टाळाटाळ करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे महापालिकेत पूर्वीपासून भेदभाव न करता समान विद्यावेतन दिले जाते. मुंबई महापालिकेने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सीपीएस निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ केली आहे.  आम्ही एमबीबीएस पदवी प्राप्त असून इतर निवासी डॉक्टर्स,  वैद्यकीय अधिकारी यांच्यासारखेच आणि त्यांच्या इतकेच काम करत आहोत. तरीही विद्यावेतनात फार मोठी तफावत आहे. आम्हा सीपीएस निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन वाढ करण्याची मागणी सातत्याने केली. परंतु, पिंपरी महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे डॉक्टरांमध्ये निराशेचे वातावरण आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरshravan hardikarश्रावण हर्डिकर