शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ससून रुग्णालयातील डाॅक्टरच्या कारने चौघांना उडवले

By नारायण बडगुजर | Updated: June 24, 2024 20:47 IST

पिंपरी येथील घटना : अपघातात पाच जण जखमी

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी/नेहरूनगर : पुणे येथील ससून रुग्णालयाच्या एका डाॅक्टरच्या कारने चौघांना उडवले. पिंपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वल्लभनगर बसस्थानकासमोर सोमवारी (दि. २४) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. 

डॉ. पियुष प्रशांत टोणपे (२२, रा. वल्लभ नगर, पिंपरी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हनुमंत कालिदास नामदास (५०, रा. नेहरूनगर, पिंपरी), रिता अनिल सुरवसे (२६, रा. पिंपळे गुरव, सांगवी), दीपक हरिभाऊ मोतेवाड (४०, रा. चिखली), नवनाथ काशिनाथ वाडेकर (४१, रा. खेड, पुणे), उमेश केंगार (४०, रा. महात्मा फुले नगर, भोसरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. पियुष टोणपे हे पुणे येथील ससून रुग्णालयात इंटर्नशिप करीत आहेत. ते सोमवारी दुपारी पुणे येथून त्यांच्या राहत्या घरी जात होते. त्यावेळी वल्लभनगर बसस्थानका समोर त्यांचा कारवरील ताबा सुटला. यात कारने धडक दिल्याने चौघे जखमी झाले. तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रिक्षालाही कारने धडक दिली. ही रिक्षा टपरीला धडकली. टपरीमध्‍ये काम करणार्‍या महिलेच्‍या अंगावर गरम तेल उडाल्‍याने ती देखील जखमी झाली. कारने धडक दिल्याने तिघे किरकोळ जखमी झाले. तसेच एक जण गंभीर जखमी झाला. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अपघातानंतर कारचालक डाॅ. पियुष टोणपे हे त्यांच्या वाहनातून जखमींना रुग्णालयात घेऊन गेले. डाॅ. पियुष यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी केली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. - अशोक कडलग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पिंपरी

टॅग्स :Accidentअपघात