शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

डीजे अन् गुलालविरहित मिरवणुका, पिंपरीत १२ अन् चिंचवडला ११ तास सोहळा; पारंपरिक वाद्यांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:41 IST

ढोल, ताशा, झांज अशा पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष, मोहक फुलांची उधळण आणि रंगलेल्या

पिंपरी : ढोल, ताशा, झांज अशा पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष, मोहक फुलांची उधळण आणि रंगलेल्या फुगड्या, चित्तथरारक प्रात्यक्षिके अशा मंगलमय वातावरणात पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीने गणरायाला निरोप दिला. पिंपरीतील आनंदसोहळ्यात ८८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची आणि चिंचवड परिसरात ५६ गणेश मंडळांचा समावेश होता. पिंपरीत १२ तास, तर चिंचवडला ११ तासांची मिरवणूक होती. शिस्तबद्ध आणि पारंपरिक वाद्याचा वापर आणि डीजे व गुलालविरहित मिरवणूक यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते.औद्योगिकनगरीचा नूर गेले बारा दिवस काही औरच होता. अवघी उद्योगनगरी गणेशमय झाली होती. शेवटच्या दिवशी सर्वांत महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी गणेश विसर्जन मिरवणूक चिंचवड आणि पिंपरी परिसरातून निघत असते. शेवटच्या दिवशी सकाळपासूनच घरगुती गणरायाचे विसर्जन करण्याची लगबग दिसून येत होती. शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी अशा तीन नद्यांच्या सुमारे २६ विसर्जन घाटांवर विसर्जनाची तयारी झाली होती. चिंचवडमधील पवना नदीघाटावर सकाळी सातपासूनच घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात येत होते; तर पिंपरीतील झुलेलाल नदीघाटावरही गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गर्दी दिसून येत होती. पावसाची उघडीप मिळाल्याने सकाळच्या टप्प्यात भक्तांनी घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. उन्हाची तीव्रता असतानाही गणेशभक्तांच्या उत्साहात तसूभरही कमतरता जाणवत नव्हती.पिंपरीतील गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात दुपारी एकला झाली, तर चिंचवड येथील आनंदसोहळ्याची सुरुवात दुपारी अडीचला झाली. पिंपरीगावातून साई चौकमार्गे शगुन चौकातही मंडळे येत होती, तर चिंचवड परिसरातील मिरवणूक चिंचवड स्टेशन, बिजलीनगर, काळेवाडीमार्गे चापेकर चौकात येऊन जकातनाका रस्त्याने थेरगाव येथील पवना घाटावर जात होती.महापालिकेकडून स्वागतपिंपरी-चिंचवड महापालिकेने शगुन चौक आणि चापेकर चौकात स्वागत कक्ष उभारला होता. महापालिकेच्या वतीने महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, सह आयुक्त दिलीप गावडे यांनी स्वागत केले.मूर्र्तिदान मोहिमेला प्रतिसादपुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीनेही दोन्ही ठिकाणी स्वागत कक्ष उभारला होता. विसर्जन मार्गावर बॅरिकेड्स लावले होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि सीसीटीव्हीची सोहळ्यावर नजर होती. प्राधिकरण नागरिक कृती समिती, पोलीस मित्र आदी सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मदत केली. संस्कार प्रतिष्ठानाने मूर्ती दान स्वीकारण्याची मोहीम राबविली.गुलालाऐवजी फुलेयंदा मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांचा वापर अधिक प्रमाणात दिसून आला़ त्याचबरोबर मोहक फुलांचे रथ लक्ष वेधून घेत होते. तसेच महिला मुली व तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. रोषणाई केलेले रथही लक्ष वेधून घेत होते. मावळ व मुळशीतील ढोल ताशा पथकांचा सहभाग लक्षणीय होता. तसेच वारकरी पथकेही सहभागी झाली होती.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन