शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीचा मुहूर्त : गतवर्षीच्या तुलनेत दुचाकी खरेदीत १० टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 01:56 IST

दिवाळीच्या सणाला नवीन वस्तूची खरेदी शुभ मानली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकीचा दसऱ्याचा एक मुहूूर्त नुकताच झाला. त्या वेळी खरेदीची सुरुवात झाल्यानंतर दिवाळीत दुचाकी खरेदी करणा-या ग्राहकांचे प्रमाण वाढले आहे.

पिंपरी  - दिवाळीच्या सणाला नवीन वस्तूची खरेदी शुभ मानली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकीचा दसऱ्याचा एक मुहूूर्त नुकताच झाला. त्या वेळी खरेदीची सुरुवात झाल्यानंतर दिवाळीत दुचाकी खरेदी करणा-या ग्राहकांचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ग्राहकांची संख्या दहा टक्क्यांनी वाढली असून, सण-उत्सव काळातील दुचाकी विक्रीतून होणारी आर्थिक उलाढालसुद्धा वाढली आहे. सुटीमुळे आरटीओत वाहन नोंदणीस विलंब होत असला, तरी मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांनी दुचाकींचे बुकिंग करून ठेवले आहे. उद्योगनगरीत ही उलाढाल अंदाजे १२ कोटींच्या घरात पोहोचली आहे.शहरातील विविध वितरकांकडे चार हजार दुचाकींचे बुकिंग दसºयापर्यंत झाले होते. ज्यांना दसºयाच्या मुहूर्तावर खरेदी करणे शक्य झाले नाही, त्यांनी दिवाळीचा मुहूर्त गाठण्यासाठी धावपळ केली. दसºयापासून वितरकांकडे ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. दुचाकीआणि चारचाकी वाहनांच्या शहरातील विविध शोरूममध्ये दिवसाकाठी पाचशेहून अधिक ग्राहक भेट देत आहेत. चारचाकी वाहनखरेदीच्या तुलनेत दुचाकी वाहनखरेदीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. दसºयापर्यंत तीन हजारांहून अधिक दुचाकींचे बुकिंग झाले होते. त्यात आणखी दोन हजार ग्राहकांची भर पडली आहे.दसºयाच्या मुहूर्तामुळे सुमारे सहा कोटींची खरेदी-विक्रीचीआर्थिक उलाढाल झाली असल्याचे वितरकांनी सांगितले होते. बुकिंग केल्यानंतर तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा, तसेच आकर्षक सवलत योजना यामुळे ग्राहक दुचाकी खरेदीस प्राधान्य देत आहे. दसरा ते दिवाळी या दोन प्रमुख मुहूर्तामध्ये दुचाकी खरेदीची उलाढाल दुप्पट झाली आहे.तरुणाईमध्ये बुलेटची क्रेझइतरांपेक्षा हटके आणि रुबाबदार वाटावे या उद्देशाने तरुणाईमध्ये बुलेटची क्रेझ आहे. दिवाळीत बुलेट खरेदी करण्यासाठी तरुणांनी अगोदरच बुकिंग करून ठेवले होते. दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी घरी आणण्याची त्यांची लगबग सुरू आहे. बिगरगिअरच्या दुचाकी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल आहे. महिला, महाविद्यालयीन मुले, मुली सहज चालवू शकतील, अशा बिगरगिअरच्या दुचाकी खरेदी करण्यास ग्राहकांची अधिक पसंती आहे. दिवाळी भेट म्हणून पालक मुलींसाठी बिगरगिअरच्या दुचाकी घेऊन देत आहेत, तर मुलांसाठी बुलेट खरेदी केल्या जात आहेत.तरुणाईला अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दुचाकींचे आकर्षण आहे. नवीन, तसेच हटके मॉडेलच्या शोधात असलेल्या तरुण ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन नव्या मॉडेलमधील दुचाकी शोरूमध्ये आल्या आहेत. ही दुचाकी कशी असेल, याबद्दलची उत्सुकता तरुणाईमध्ये निर्माण झाली आहे. या नव्या श्रेणीतील दुचाकींच्या बुकिंगसाठीही वितरकांकडे विचारणा होऊ लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली असून, दुचाकी विक्री व्यवसाय दहा टक्क्यांनी वाढला आहे. - निक्की सेहगल, संचालक, सेहगल आॅटो रायडर, चिंचवड

टॅग्स :Diwaliदिवाळीbusinessव्यवसाय