पिंपरी : ९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चाचे पिंपरी-चिंचवडमधील विभागीय कार्यालय सोमवारी सुरू करण्यात आले. तानाजीनगर, चिंचवड येथील दिनकर भोईर व्यायामशाळा येथे सुरु झालेल्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर मोर्चाच्या नियोजनाची बैठक समन्वयक शांताराम कुंजीर यांनी घेतली.मोर्चा यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन कुंजीर यांनी या वेळी केले. तसेच हा शेवटचा मूक मोर्चा असेल असेही त्यांनी सांगितले. प्रवीण पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश जाधव, नगरसेवक सुरेश भोईर, किरण शितोळे, दादासाहेब पाटील, नानानासाहेब वारे यांनीही मार्गदर्शन केले. अभिषेक म्हस्के यांनी आभार मानले. या वेळी स्मिता म्हसकर, जीवन बोºहाडे, सतीश काळे, विनायक जगताप, अमोल बोत्रे, समीर येवले, सोमनाथ वाल्हेकर उपस्थित होते.
मराठा क्रांती मोर्चाचे शहरात विभागीय कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:41 IST