शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा.. भीती...आणि सुटकेचा निःश्वास.. कारण बिबट्या नव्हे ते रानमांजर निघाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 20:53 IST

सांगवी : संरक्षण विभागाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू झाल्याने सांगवी परिसरात स्थानिकांमध्ये घबराट होती. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ...

ठळक मुद्देसंरक्षण विभागाच्या हद्दीत अधिकाऱ्यांनी केली पाहणीमॉर्निंग वॉक, शतपावली करणारे धास्तावले 

सांगवी : संरक्षण विभागाच्या हद्दीत बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू झाल्याने सांगवी परिसरात स्थानिकांमध्ये घबराट होती. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संरक्षण विभागाच्या हद्दीत पाहणी केली. बिबट्या नव्हे तर रानमांजर सदृश्य प्राणी असल्याची शक्यता या अधिकाऱ्यांनी वर्तवली. त्यामुळे दोन दिवसांपासून भयभीत असलेल्या स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, सांगवी परिसरात संरक्षण विभागाच्या हद्दीत सोमवारी (दि. १३) बिबट्या निदर्शनास आला असून, त्याबाबत संरक्षण विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे परिपत्रक सीक्यूएई विभागातर्फे जारी करण्यात आले होते. सुरक्षा अधिकारी डी. पी. साना यांच्या स्वाक्षरीचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. सांगवी पोलीस ठाण्यालाही याबाबत पत्र देण्यात आले. त्यामुळे सांगवी परिसरात बिबट्याचा वावर असल्याची बातमी वाºयासारखी पसरली. त्यामुळे वनविभागाचे वनरक्षक विजय शिंदे, वनपाल महेश मेरगेवाड व सांगवीतील वन्यजीव संरक्षण संस्थेचे विनायक बडदे यांनी संरक्षण विभागाच्या हद्दीत गुरुवारी (दि. १६) दुपारी पाहणी केली. बिबट्याच्या पायांचे ठसे अथवा इतर पुरावे या पाहणीदरम्यान आढळून आले नाहीत. प्रत्यक्षदर्शींकडेही याबाबत विचारणा करण्यात आली. बिबट्याशी मिळते जुळते वर्णन या चौकशीत मिळून आले नाही. या भागात रानमांजर असल्याचे दिसून येत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे येथे बिबट्या नसून रानमांजर असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.  त्यामुळे सांगवी परिसरात बिबट्या दिसल्याच्या वृत्तास पूर्णविराम मिळाला.

आयटीनगरीच्या परिसरात बिबट्याचे दर्शनआयटीनगरी हिंजवडीलगत असलेल्या कासारसाई परिसरात स्थानिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. कासारासाई परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा आयटीनगरीत पसरली. याच आयटीनगरीला लागून सांगवी परिसर आहे. या परिसरात आयटी तील कर्मचारी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. सांगवी परिसरातही बिबट्या निदर्शनास आल्याची चर्चा होती. त्यामुळे येथील आयटीयन्स आणि स्थानिकांमध्ये घबराट होती. मात्र बिबट्या नव्हे तर रानमांजराचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने आयटीयन्स आणि स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. 

मॉर्निंग वॉक, शतपावली करणारे धास्तावले सांगवी येथे संरक्षण विभागाच्या हद्दीत मोठ्या संख्येने झाडे आहेत. तसेच या परिसरात मुळा नदी आहे. या नदीच्या दुतर्फा दाट झाडे आहेत. त्यामुळे येथे मॉर्निंग वॉकसाठी आणि शतपावलीसाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. हे नागरिक बिबट्याच्या चर्चेमुळे धास्तावले.

 

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforest departmentवनविभाग