शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारचा पाणी आरक्षणाला खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 03:17 IST

महापालिकेकडून पाठविला प्रस्ताव : राज्यकर्त्यांचे पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष; नुसत्याच होताहेत बैठका

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील पाणीटंचाई सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू असून, जलसंपदा विभागाला पत्र दिले आहे. त्यामुळे पाणी आरक्षणाबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे पाण्यासाठी शहरवासीयांना वाट पाहावी लागणार आहे.पवना धरणातून सध्या पिंपरी-चिंचवड शहराला ४५० एमएलडी पाणीपुरवठा होतो. शहराची लोकसंख्या आता २२ लाखांवर गेली आहे. मोठ्या प्रमाणावरील शहरीकरणामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत आहे. पाणीटंचाईने पिंपरी-चिंचवडकर हैराण आहेत.पाणी पुरवठ्यासंदर्भात महापालिकेने चार टप्प्यांचे नियोजन केले होते. तसेच पंधरा वर्षांपासून २४ तास पाण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते. मात्र, ते अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यानुसार तीन टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. चौथ्या टप्प्यात पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचे नियोजन होते. मात्र, बंदिस्त जलवाहिनी रखडली आहे. त्यामुळे आरक्षणापेक्षा अधिक पाणी उचलले जात आहे. अतिरिक्त पाणी उचलू नये, अशा सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेलादिल्या आहेत. तसा पत्रव्यवहारही केला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीटंचाईत भर पडली आहे. पवना धरणासाठी सध्या ३६७ एमएलडी पाण्याचे आरक्षण आहे. चौथ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर ४७१ एमएलडी पाणी शहरासाठी मिळणार आहे.पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रखडल्याने महापालिकेने आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे नियोजन केले. आंद्रातून १०० आणि भामा आसखेडमधून १६७ एमएलडी पाणी आरक्षण जलसंपदा विभागाने मंजूर केले होते. मात्र, हे आरक्षण महापालिकेने शासनास रक्कम न दिल्याने रद्द केले आहे.आरक्षणासाठी असणारी रक्कम २३२ कोटींची रक्कम माफ करावी, अशी मागणी नागपूर अधिवेशनाच्या कालखंडात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्या वेळी पाणी आरक्षणासाठीची रक्कम माफ करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी केली होती. त्यावर तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आठवड्यात बैठक होणार होती, ती झाली नाही. या संदर्भात महापालिकेने जलसंपदा विभागाशी पत्रव्यवहार केला आहे.निधीची अडचण : जलसंपदा विभागाचे दुर्लक्षपिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी आरक्षण वाढवून देण्यासाठी पुण्यातील जलसंपदा विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. पाणी आरक्षणापोटी असणारी रक्कम भरा, त्यानंतर आरक्षण देऊ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे जोपर्यंत सरकारकडे रक्कम भरली जात नाही, तोपर्यंत आरक्षण वाढवून मिळणार नाही.असे आहे आरक्षणपिंपरी-चिंचवडसाठी पवना धरणातून ३७१ एमएलडी प्रतिदिन, भामा आसखेड धरणातून १०० एमएलडी, आंद्रा धरणातून १६७ एमएलडी आरक्षण आहे. पवना धरणातून आणखी १०० एमएलडी पाणी आरक्षण मिळणार आहे.पाणीप्रश्नी आयुक्तांना धरले धारेवरदिघी, बोपखेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महिला, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावरून स्थायी समितीचे सदस्य विकास डोळस यांनी पाणीपुरवठा विभाग आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली.स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक डोळस म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण भरले असून, मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्या, नाले ओसांडून वाहत आहेत. तरीही, दिघी, बोपखेल परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. आठ-आठ दिवस या परिसरात पाणीपुरवठा होत नाही. या परिसरातील अनेक महिला नोकरी करून कौटुंबिक जबाबदारी सांभाळतात. केवळ अर्धा तास पाणी येत आहे. त्यामुळे पूर्ण दिनचर्या, दैनंदिन कामकाज बिघडून महिलांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.अर्धातासापैकी केवळ वीस मिनिटेच पाणी येते. त्यामुळे महिलांना मोठा त्रास होत आहे. शहराच्या इतर भागांत व्यवस्थित पाणीपुरवठा होत असताना दिघी परिसरात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. सुरळीत पाणीपुरवठा देखील होत नाही. पाणी आले तरी अतिशय कमी दाबाने येत आहे. तेही वीस मिनिटेच पाणी येत आहे. पाणी येण्याचीवेळ देखील निश्चित नाही. कधीही अवेळी पाणी येत आहे. आणीबाणी सारखी परिस्थिती दिघी परिसरात उद्भवली आहे.भल्या सकाळी दीडशे लोक नगरसेवकांच्या घरी पाण्यासाठी येतात. नगरसेवकांना पहाटे चार वाजल्यापासून पाण्याच्या टाक्या भरल्या आहेत का हे पहावे लागते. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित हा प्रश्न मार्गी लावावा.’’ त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘दिघी परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. याबाबत लवकरच अधिकाºयांची स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल.’’

टॅग्स :DamधरणWaterपाणी