शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डायबेटिस, हाय बीपी पेशंटला महागाईचा ‘डोस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 02:48 IST

मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या औषधांच्या किमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

- प्रकाश गायकरपिंपरी : मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या औषधांच्या किमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांच्या खिशाला कात्री लागत आहे. औषधांच्या वाढलेल्या किमतीवर सेवा व वस्तूकर लावून या औषधांची किंमत सुमारे ७ ते १० टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या औषधांवर दरमहा साधारणत: अडीच ते तीन हजार रुपये खर्च होत होता. मात्र आता औषधांच्या किमती वाढल्याने त्यामध्ये ३०० ते ३५० रुपयांची वाढ होणार आहे. अनेक कंपन्यांनी औषधांच्या स्वरूपामध्येही बदल केल्याचे दिसून येते. तसेच अनेक कंपन्यांनी गोळ्यांचे नाव तेच ठेवून आवरण व त्यातील घटक बदलले आहेत.उच्च रक्तदाबाच्या टेमसीन ४०, प्रोलेमेट एएम ५०, प्रोलमेट एस्क्स ५०, इरिटेअल ट्रिओ, टेमसन सीटी ४० या औषधांचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर मधुमेहावरील ग्लिमीसेव्ह एम १, अ‍ॅफोग्लिप एम ५५०, इस्टामेट क्लिझियो ट्रायो २ अशा वेगवेगळ्या औषधांच्या किमती वाढल्याने आजाराने आधीच बेजार झालेल्या रुग्णांना महागाईच्या झळा बसत आहेत. मधुमेहाबरोबरच उच्च रक्तदाबाची औषधे महागल्याने रुग्णांना घरखर्च करताना मोठी कसरत करावी लागत आहे. औषधे विकत घेण्यासाठी दरमहा ३०० ते ३५० रुपये जास्तीचे मोजावे लागत आहेत. त्यामुळे या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना औषध खरेदी करताना चांगलीच आर्थिक झळ सोसावी लागत आहे.>कंपन्यांनी अनेक औषधांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब या औषधांचा समावेश आहे. या आजारांवरील औषधांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने कंपन्यांमध्येही मोठी स्पर्धा आहे. अनेक कंपन्यांनी आपलीच औषधे खरेदी करावीत यासाठी गोळ्यांच्या आवरणामध्ये व कंटेन्टमध्येही बदल केले आहेत.- विवेक तापकीर, उपाध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे जिल्हा