शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीमध्ये ‘धरण उशाला, कोरड घशाला’; पवना धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असूनही नागरिकांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 23:19 IST

यंदाच्या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरण क्षेत्रातही भरघोस पाऊस पडला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली, असे बोलले जात होते.

- मंगेश पांडेपिंपरी : यंदाच्या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणाºया पवना धरण क्षेत्रातही भरघोस पाऊस पडला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली, असे बोलले जात होते. मात्र, महापालिका प्रशासनाच्या नियोजनाअभावी शहरवासीयांवर उन्हाळ्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यातच पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी स्थिती सध्या शहरात आहे.पवना धरणात साडेआठ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. याच धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात हे धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांनीही समाधान व्यक्त केले. सध्यादेखील या धरणात तब्बल ९६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फुगेवाडीसारख्या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याचा खडखडाट आहे. याकडे पालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांवर रस्त्यावर उतरून आंदोलनाची वेळ आली.धरणात मुबलक पाणीसाठा असताना तसेच पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेसाठी लाखो रुपये खर्च केले असतानाही नियोजनाचा अभाव आहे.योग्य नियोजनाचा अभावपाणीपुरवठा ही तातडीक सेवा आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या बजेटसह महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. शहरात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार रावेत येथील बंधाºयातून दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा केला जातो. मात्र, त्याचे वितरण करताना योग्य नियोजन केले जात नसल्याने सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.कमी दाबाने पाणीपुरवठाशहराच्या काही भागात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यामुळे साथीच्या आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. अर्धा तासासाठी पाणी सोडले जाते. पाण्याचा दाब कमी असतो. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिक सांगतात.पिंपरी-चिंचवड शहर की दुष्काळी गावफुगेवाडीत पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांकडून ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. धरणातील मुबलक पाणीसाठा व पाणीवितरणाच्या यंत्रणेसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही वेळेत व पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे शहरातील काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यामुळे हे पिंपरी-चिंचवड शहर आहे की दुष्काळी गाव असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.

टॅग्स :Damधरण