शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

"गाढवाच्या अंगी चंदनाची उटी..." उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्षरित्या निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 22:16 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले.

 पिंपरी : गाढवाच्या अंगी चंदनाची उटी राखे सवी भेटी गेली तडे, हा तुकाराम महाराज यांचा प्रचलित अभंग आहे. याचाच अर्थ गाढवाला कितीही चंदन उटी लावली तरी तो उकिरड्यात जाऊन राख अंगाला लावून घेणारच आहे. सध्याच्या राजकारणात अनेक लोक विविध नाटक करत आहेत. पण नागरिक सुज्ञ असून लवकरच कट्यार काळजात घुसणार आहे आणि त्याच्या वेदना होणार आहेत हेही लक्षात ठेवावे, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले, "सध्या राज्यामध्ये राजकीय धुराळा सुरू आहे. दररोज कोणीतरी अंगाला राख लावून घेत आहे. या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावाने नाट्यगृह बांधण्यात आले आहे. या नाट्यगृहात तुम्ही चांगले नाटक बघाल. पण काहीजण नाट्यगृहाबाहेर नाटक करत आहेत. मनात येईल तसं कथाकथन रचले जात आहे. मानअपमानाचे वेगवेगळे अंक होत आहेत. नटसम्राट सारखे वागले म्हणजे नटसम्राट होता येत नाही हे जरा राजकारण्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. मात्र या राज्यातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे संबंधित राजकारणी कसेही वागले तरी कट्यार काळजात घुसणार आहे आणि मग वेदना होणारच आहेत. कारण आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा डंपर कधीच पलटी केला आहे. "

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड