शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वादात रखडला कार्ला देवस्थानाचा विकास; एकवीरा गड सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 12:38 IST

कार्ला येथील एकवीरा देवस्थानाचा विकास येथील ‘तू तू-मैं मैं’च्या वादात रखडला आहे. याकडे पुरातत्त्व खातेही लक्ष देत नाही. 

ठळक मुद्देरस्त्याची समस्या कायम, पावसाळ्यात कार्ला फाट्यापासून पाण्यातून शोधावा लागतो रस्ताग्रामस्थ, ग्रामपंचायत, देवस्थान यांच्यामध्ये नाही सुसंवाद, तू तू-मैं मैं’पणामुळे विकासाला खीळ

कार्ला : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील एकवीरा देवस्थानाचा विकास येथील ‘तू तू-मैं मैं’च्या वादात रखडला आहे. येथील रस्त्याची समस्या वर्षानुवर्षे कायम आहे. रस्त्यात खड्डे का खड्ड्यांत रस्ता अशी अवस्था आहे. पावसाळ्यात कार्ला फाट्यापासून भाविक, पर्यटकांना पाण्यातून रस्ता शोधावा लागतो. पथदिव्यांचीही व्यवस्था नाही. रात्रीच्या वेळी अंधारात रस्ता शोधताना गोंधळ उडतो. पाण्याची मुबलक व्यवस्था नाही, आठ-आठ दिवस पाणी येत नाही. पोलीस मदत चौकी यात्रेपुरतीच सुरू असते. गडावर वाहनतळ एकच आहे. ते फुल्ल झाले, की वाहने रस्त्यावरच लावली जातात. यामुळे वाहतूककोंडी होते. मोक्याच्या ठिकाणी भक्तनिवास नाही. रोपवेचा कित्येक दिवसांचा प्रश्न प्रलंबित आहे. पुरातन लेणीही मंदिराच्या जवळच आहे. पायर्‍या निखळल्या आहेत. याकडे पुरातत्त्व खातेही लक्ष देत नाही. ग्रामस्थ, ग्रामपंचायत, देवस्थान यांच्यामध्ये सुसंवाद नाही. आपापसातील ‘तू तू-मैं मैं’पणामुळे विकासाला खीळ बसली आहे. नियोजनबद्ध विकासाची भूमिका घेतल्यास देवस्थान, येथील चार गावांचा विकास होऊ शकतो. 

टॅग्स :Templeमंदिरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड