शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

‘पेटा’च्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार; बैलगाडा मालक-चालक कृती समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 16:07 IST

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यात पेटा या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खोडा घातला आहे. या पेटाच्या विरोधात राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.

ठळक मुद्देभोसरी येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक-शौकिन यांची बैठक झाली.पेटाच्या विरोधात राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार आमदार महेश लांडगे यांनी केला.

पिंपरी : अखिल भारतीय बैलगाडा मालक-चालक कृती समिती यांच्या वतीने मंगळवारी भोसरी येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालक-शौकिन यांची बैठक झाली. त्यावेळी यावेळी पेटा या संस्थेच्या हेतूला लक्ष्य केले. बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यात पेटा या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खोडा घातला आहे. सत्ताधारी भाजप सरकार शर्यतीबाबत सकारात्मक आहे. पण, बैलगाडा मालकांचा खरा शत्रू पेटा आहे. या पेटाच्या विरोधात राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.भोसरी येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये बैठक झाली. यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, विधी समिती सभापती सागर गवळी, क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, नगरसेवक राहुल जाधव, वसंत बोर्‍हाटे, कुंदन गायकवाड, संजय नेवाळे, राजेंद्र लांडगे, बैलगाडा मालक भानुदास लांडगे, काकासाहेब गवळी, अंकूश मळेकर, नरहरी बालघरे, अभिजित तिकोणे, केतन जोरी, महेश शेवकरी, भाउसाहेब गिलबिले, सतोष गव्हाणे, काळुराम सस्ते, विलास भुजबळ, मयूर वाबळे, अण्णा भेगडे, राहुल सातपुते, दत्तात्रय मोरे, किसन यादव, राजू नेवाळे, विनायक मोरे, अनिल लांडगे आदी उपस्थित होते.आमदार लांडगे म्हणाले, सुमारे २००८ पासून बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी लढा सुरू आहे. मात्र, २००८ ते २०१४ पर्यंत कोणत्याही सरकारने बंदी उठविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली नाही. तसेच, कोणत्याही पक्षाच्या नेत्यांने स्वखर्चाने न्यायालयात बाजू मांडण्याची भूमिका घेतली नाही. मात्र, भाजपाच्या सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत कायदा तयार केला. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांनी पाठिंबा देवून संबंधित विधेयक मंजूर केले. तसेच, न्यायालयीन लढाईसाठी राज्य सरकारने स्वखचार्तून वकीलांची नेमणूक केली आहे.मात्र, काहीलोक बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत सरकारचे अपयश असल्याचा अपप्रचार करीत आहेत. मात्र, सरकारच्या सहकार्याशिवाय बैलगाडा शर्यतीचे विधेयक तयार होणे अशक्य होते.आमदार लांडगे म्हणाले, बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत आजवर जो काही पाठपुरावा केला. त्याबाबत मी कधीही मीच केले, असे म्हटलेले नाही. आजपर्यंत कोणत्याही व्यासपीठावर मी बैलगाडा शर्यतीबाबत केलेल्या पाठपुराव्याचे राजकारण केले नाही. एवहढेच नव्हे, तर माज्याशिवाय बैलगाडा शर्यती सुरू होणार नाहीत, असेही कधी म्हटलेले नाही. मी प्रामाणिकपणे बैलगाडा मालकांसाठी काम करीत आहे. राजकीय फायदा होवो अथवा न होवो मी बैलगाडा शर्यतीवरून श्रेयवादाचे राजकारण केले नाही. करणार नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडagitationआंदोलन