शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डिझायनर बाप्पाची वाढली क्रेझ, रंगाबरोबर मोत्यांची माळ, आभूषणांची सजावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 01:25 IST

यंदा मूर्तिकारांनी ‘डिझायनर गणपती’ तयार केले आहेत.

रहाटणी : यंदा मूर्तिकारांनी ‘डिझायनर गणपती’ तयार केले आहेत. मूर्तीला सुबक रंगच नव्हे, तर मोत्यांच्या माळा, वेल्वेटचे धोतर, फेटा, आभूषणांनी सजविण्यात आले. असे ‘डिझायनर बाप्पा’ लक्ष वेधून घेत आहेत.प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती, लालबागचा राजा, शंखावरील गणरायाची मूर्ती, जय मल्हार, विठ्ठल अशा अनेक रूपांतील गणपती बाजारात आले आहेत. पूर्वी यावर पीओपीचे दागिने साकारलेले असतात; पण आता या मूर्तीवर मोत्यांचे दागिने घालण्यात येऊ लागले आहेत. पूर्वी शहरात काही कलाकार मूर्तिकारांकडून मूर्ती खरेदी करून मोती, मणी चिकटवीत, पण आता मूर्तिकारांनीच मूर्तीला दागिने घालून सजविण्यास सुरुवात केली आहे. मूर्तीच्या रंगानुसार दागिने लावण्यात येत असल्याने मूर्ती आणखी उठावदार दिसत आहे.याबाबत मूर्तिकार म्हणाले, ‘‘मूर्तीमधील रंगसंगतीमध्ये आम्ही आमूलाग्र बदल केला. गडद, चमकदार, उठावदार रंगांचा वापर करणे सुरू केले. त्यानंतर पीओपीच्या दागिन्यांनाही हुबेहूब बनविण्याचा आम्ही प्रयत्न केला. अस्सल सोन्याचे दागिने फिके पडतील असे पीओपीचे दागिने बनविले जाऊ लागले. यंदा मूर्तीला वरून दागिन्याने मढविण्याचा ट्रेंड आला आहे. यास ‘डिझायनर बाप्पा’ असे म्हटले जात आहे.मूर्तीच्या आकारानुसार लहान मोती, मोठे मोत्यांचे हार तयार करून ते घातले जात आहेत. मूर्तीच्या सोंडेलाही चमकणाऱ्या टिकल्या, स्टोनने सजविले जात आहे. गणरायाचे सोवळ्यातील धोतरही लाल किंवा पिवळ्या वेल्वेटच्या कापडाने तयार केले जात आहे. त्यास काठावर लेस लावली जात आहे. तसेच वेल्वेट इ. वस्त्रांनी पगडी तयार करण्यात आली आहे. त्यासही मोती, टिकल्या, स्टोनने सजविण्यात आले आहे. मुकुटही अशाच पद्धतीने सजवून आकर्षक करण्यात आला आहे.गणेशभक्तांमध्ये गणेशोत्सवाबद्दल एवढा उत्साह आहे की, आपल्या घरातील मूर्तीची आगाऊ नोंदणी केली जाऊ लागली आहे. मूर्तिकारांकडील २० टक्के मूर्तींची आगाऊ नोंदणी झाली आहे. यात घरगुती मूर्ती खरेदी करणाºयांची संख्या अधिक आहे. डिझायनर गणपतीची किंमत ५०० ते ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत आहे. या किमतीतही मूर्ती खरेदी करणारे भाविक शहरात आहेत, याची प्रचिती मूर्तिकारांकडील आगाऊ नोंदणी पाहिल्यावर लक्षात येत आहे.मूर्तींची आगाऊ नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे ऐनवेळी येणाºया ग्राहकांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे.>पेणच्या गणपतीला मागणीसध्या बाजारात गणपती विक्रीची दुकाने सजली आहेत. राज्यातून व राज्याबाहेरून अनेक गणपती विके्रते शहरात दाखल झाले आहेत. कोणी मातीचे, तर कोणी प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे गणपती विक्रीस ठेवले आहेत. पिंपरी येथील नवमहाराष्ट्र शाळेच्या मागच्या बाजूस गणपती विक्रीची शेकडो दुकाने सजली असली, तरी प्रत्येक भाविक पेणच्या गणपतीची मागणी करीत असल्याचे आढळून येत आहे. बाजारात काही मोजक्याच गणपती विक्रेत्यांकडे पेणचे गणपती मिळत असल्याचे काही विके्रत्यांनी सांगितले. खरे तर मातीचे गणपती हे महाग असल्याने अनेक नागरिक स्वस्तातील प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे गणपती घेत आहेत. हे जरी असले तरी भाविक इको फ्रेंडली गणपतीला जास्त पसंती देताना दिसून येत आहेत. अनेक भाविक शाडू मातीचा गणपती आहे का, अशी विचारणा करताना स्टॉलवर दिसून येत आहेत.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सव