शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

पुणेरी पाट्यांचे चिंचवडला आजपासून प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 01:27 IST

पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते, हे पहायचंय? इरसाल, मार्मिक, हळूच चिमटा काढणाऱ्या पुणेरी पाट्यांची सर्वांत मोठी मेजवानी खास पिंपरी-चिंचवडच्या रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पिंपरी - पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते, हे पहायचंय? इरसाल, मार्मिक, हळूच चिमटा काढणाऱ्या पुणेरी पाट्यांची सर्वांत मोठी मेजवानी खास पिंपरी-चिंचवडच्या रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणेकर जगाच्या पाठीवर कुठेही गेले, तरी आपली स्वत:ची ओळख निर्माण करतात. पुणेकरांचा अभिमान पुणेरी पाट्यांच्या सर्वांत मोठ्या प्रदर्शनातून झळाळून निघणार आहे. ८ व ९ जुलै रोजी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत चिंचवड येथील चापेकर चौकाजवळील गंधर्व हॉलमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांच्या मिश्कीलपणाचा आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो पुणेकरांच्या स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती, पुण्याच्या या अभिमानाचे साक्षीदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वलर्स प्रस्तुत मेन्स अ‍ॅव्हेन्यूच्या सहयोगाने रविवारी व सोमवारी ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजित केले आहे. राहुल कलाटे व राणी पुतळाबाई वुमेन्स लॉ कॉलेज (भोसरी) हे सहप्रायोजक आहेत. आइस्क्रीम पार्टनर ‘खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी’, आऊटडोअर मीडिया पार्टनर धीरेंद्र, व्हेन्यू पार्टनर कर्तव्य फाउंडेशन आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अभिनेत्री प्रियंका यादव व गायिका श्रावणी रवींद्र यांच्या हस्ते होणार आहे. ‘आम्ही खाण्याचे पैसे घेतो; अन्न पानामध्ये टाकण्याचे नाही’, एक ते चार या वेळेत कोणीही प्रचारासाठी येऊ नये’, ‘चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते’, ‘आमच्या घरातील मुले क्रांतिकारक आहेत; त्यामुळे तुमच्या गाडीवर हल्ला झाल्यास आम्ही जबाबदार असणार नाही’, ‘आमचं कुत्रं ९९ जणांना चावलंय, तुम्ही बेसावध राहिलात, तर त्याची सेंच्युरी पूर्ण होईल’ अशा पाट्या दृष्टीस पडू लागल्या, की तुम्ही नक्की पुण्यातच आहात हे सुज्ञास सांगणे न लगे ! पुणेरी पाट्यांमधून स्वत:च्या व्यंगावर बोट ठेवण्याचं धाडस दाखवत चपखल शब्दांमधून मार्मिक टिप्पणीही झळकते याच पाट्यांमधून..! याला वयाचं बंधन नाही, शिक्षणाची अट नाही. अगदी एखादा मुलगाही मार्मिक शब्दांत भलामोठा आशय व्यक्त करतो व एखादे वयस्कर आजोबाही ‘या रस्त्यावरचा सिग्नल विमानालाही उपयोगी पडतो’ असे म्हणू शकतात.-खडूस, खत्रूड, खवचट व तरीही हवेहवेसे वाटणारे या पाट्यांमधील शब्द अस्सल पुणेकरांची तैलबुद्धी दाखवतात व त्यांचा खास पुणेकरी बाणाही ! हा बाणा प्रदर्शनातून खास पद्धतीने अनुभवता येणार आहे.- चिंचवड येथील चापेकर चौकजवळील गंधर्व हॉलमध्ये रविवारी (दि. ८ जुलै) व सोमवारी (दि. ९ जुलै) सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून ते विनामूल्य आहे. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या