शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

डीजे बंदीमुळे लग्नसराईमध्ये बँजो पार्टीला वाढली मागणी; जुन्या वाद्यांना आले सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 13:41 IST

डीजेच्या युगातही बँजोला सर्वत्र मागणी आहे. सनईसारख्या पारंपरिक वादनकलाही टिकून आहे. डीजेवरील बंदीची पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे या वाद्यांना आता सुगीचे दिवस येत असल्याचे दिसत आहेत.

ठळक मुद्देढोल, ताशा, पिपाणी, हलगी आणि गायन यांच्यावर वऱ्हाडी मंडळी नाचण्यात गुंग डीजे पूर्णपणे बंद झाल्यास पारंपरिक वाद्यांना सुगीचे दिवस

थेरगाव : हल्लीच्या डीजेच्या युगातही बँजोला सर्वत्र मागणी आहे. सनईसारख्या पारंपरिक वादनकलाही टिकून आहे. डीजेवरील बंदीची पोलिसांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे या वाद्यांना आता सुगीचे दिवस येत असल्याचे दिसत आहेत.कोणतेही मंगलकार्य असेल, तर त्यात तरुणाईचा आवडता विषय म्हणजे वरात आणि परण्या. लग्नाची वरात आणि मिरवणुकीत तर बेंजो पार्टीचा आणि सनई वाद्यांचा ताफा हवाच असतो. त्यात ढोल, ताशा, पिपाणी, हलगी आणि त्यासोबत असणारे लाइव्ह गायन यांच्या गाण्यावर वऱ्हाडी मंडळी नाचण्यात गुंग झाल्याचे सध्या सर्वत्र दिसत आहे.लग्न कार्यात सनई ताफा हवाच. परंतु कधी काळी कानाला मंजुळ सुरांची साद घालत, ऐकणाऱ्याला देहभान विसरून लावणारी मंगल ‘सनई लुप्त होते की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. २१ व्या शतकात माहिती आणि तंत्रज्ञानाचा स्फोट झाल्याने अनेक माहितीची आणि ज्ञानाची दालने खुली झाली. नव्या बदलांचा वेग प्रचंड वाढला.जीवनशैली प्रचंड बदलली आणि त्याचे सर्वच घटकांवर चांगले-वाईट परिणाम जाणवू लागले. लग्नासारखी मंगल कार्ये घर सोडून हॉलमध्ये आली. लग्नसोहळा काही तासांचा धनी झाला. हळद, आहेर, मानपान, रुखवत, वर ओवाळणी या बाबी जशा विवाह समारंभातून हद्दपार झाल्या, त्याचप्रमाणे बँजो पार्टी आणि सनई ताफ्याच्या जागेवर मात्र डीजेने सर्वांवर मात केली. कानठळ्या बसवत हृदयाची धडधड वाढवणाऱ्या प्रचंड आवाजाच्या मोठमोठ्या भिंतींनी प्रचंड प्रमाणात धुमाकूळ घातला.लग्नाच्या वरातीत लाइव्ह वाजवण्याबरोबरच बँजोच्या मदतीने गाणी वाजवण्याचीही हौस भागवली जाते. गाण्याच्या फर्माईशी आणि त्यावर तासन्तास न थकता बेहोष होऊन थिरकणारी पावले हीच या समारंभाची केंद्रबिंदू ठरतात.डीजेवर काहीसे निर्बंध आले. मात्र या न्यायालयाच्या आदेशाची पूर्ण अंमलबजावणीच होत नसल्याने डीजेचा आवाज काही ठिकाणी कायम आहे. ही बंदी पूर्णपणे अमलात आल्यास या पारंपरिक वाद्यांना आणि बँजो पार्टीला आलेले सुगीचे दिवस कायम राहतील, यात काही वावगे नाही, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेThergaonथेरगाव