शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

देहूगाव - माळीनगरात अशुद्ध पाणी, प्रशासनाचे दुर्लक्ष  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:09 IST

देहूगाव: येथील माळीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने येथील नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.श्रीक्षेत्र देहूगावला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या देहूगावसाठी नवी पाणीपुरवठा योजना सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून केली.ही ...

देहूगाव: येथील माळीनगर भागात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने येथील नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत.श्रीक्षेत्र देहूगावला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या देहूगावसाठी नवी पाणीपुरवठा योजना सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून केली.ही योजना तयार असून, ती कार्यान्वित करण्यासाठी तपासणीही झाली. मात्र त्यांनी ती योजना देहूगाव व विठ्ठलनगर भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी केली आहे. मात्र माळीनगरसाठी ही योजना कार्यान्वित केली नव्हती. त्यामुळे जुन्या योजनेतूनच पाणीपुरवठा केला जात आहे. या प्रकल्पातील शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारी वाळूही खराब झाली होती. त्यामुळे काही भागात खराब व गढूळ आणि हिरवे, शेवाळमिश्रित पाणी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने उपसरपंच संतोष हगवणे व ग्रामविकास अधिकारी यांनी तातडीने प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.यापूर्वी माजी सरपंच हेमा मोरे यांनीही भेट देऊन येथील कर्मचाºयांना पाणीपुरवठा शुद्ध व सुरळीत करण्यासंदर्भात काही सूचनाकेल्या. तेव्हा त्यांना क्लोरिनेशनकाम योग्य रीतीने होत नसल्याचे आढळले होते. यात्रा काळात असे काही होणार नसल्याचे येथील असे शाखा अभियंता धनंजय जगधने यांनी सांगितले.याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूषण भारती म्हणाल्या, ‘‘ग्रामपंचायत व महाराष्ट्रजीवन प्राधिकरण विभाग यांना जानेवारी, फेब्रुवारी व मार्चमध्येही लेखी कळविले आहे. मात्रतरीही दखल घेतली नाही. त्यामुळे पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत.’’माळीनगर भागात तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी येथील महिला कार्यकर्त्या वैशाली टिळेकर यांनी केली आहे.साथीचे आजार : दक्षता घेण्याचे आवाहन१गेल्या दोन दिवसांत अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने काविळीचीशक्यता नाकारता येत नाही. काविळीचे जंतू हे आठ दिवससुप्तावस्थेत राहू शकतात. याबाबत आणखी दोन-तीन दिवसांनी निश्चित काय ते समजू येईल. मात्र लोकांनी पाणी उकळून व मेडीक्लोरचा वापर करून शुद्ध करून वापरावे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.२शाखा अभियंता धनंजय जगधने म्हणाले की, नवीन योजनेची तपासणी सुरू असून, जुन्या योजनेतील वाळू खराब झालेली होती. त्यामुळे काही वेळा गढूळ व हिरव्या पाण्याचा पुरवठा झाला होता. आता मात्र माळीनगरलाही नवीन योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्या दृष्टीने आज चाचणी करून शुद्ध पाणीपुरवठा केला आहे. त्याचे नमुने तपासूनदेखील घेतलेले असल्याने हा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड