शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोडला महावितरण वीज उपकेंद्रासाठी जागा देण्यास संरक्षण विभागाची मान्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 12:08 IST

महावितरण कंपनीसाठी देहूरोड कँटोन्मेंट परिसरात वीज उपकेंद्र उभारण्यासाठी जागेचे वर्गीकरण बदलून संबंधित २८ गुंठे जागा देण्याचा प्रस्ताव दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयाच्या रक्षा संपदा विभागाने मंजूर केला आहे.

ठळक मुद्देसंबंधित जागा ३० वर्षे मुदतीसाठी फुटाला १ रुपया दराने भाडेतत्वावर देण्याबाबत सूचनाबोर्ड उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी दिला होता जागा देण्याचा प्रस्ताव

देहूरोड : महावितरण कंपनीसाठी देहूरोड कँटोन्मेंट परिसरात वीज उपकेंद्र उभारण्यासाठी जागेचे वर्गीकरण बदलून संबंधित २८ गुंठे जागा देण्याचा प्रस्ताव दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयाच्या रक्षा संपदा विभागाने मंजूर केला असून याबाबतचे पत्र पुण्यातील दक्षिण विभाग प्रधान संचालक कार्यालय व देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाला नुकतेच  प्राप्त झाले आहे. महावितरणला संबंधित जागा तीस वर्षे मुदतीसाठी प्रत्येक फुटाला एक रुपया या दराने भाडेतत्वावर देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. महावितरणला वीज उपकेंद्र उभारणी करण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव बोर्ड उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांनी दिला होता.देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांच्या नेतृत्वखाली सर्व बोर्ड सदस्य व सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक यांच्यामार्फत आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी महावितरणचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी डी. पी. पेठकर यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी देहूरोड परिसरात वीज उपकेंद्र उभारण्यासाठी जागेची मागणी केली होती. खंडेलवाल यांनी दोन वर्षापूर्वी संबंधित जागा देण्याचा प्रस्ताव बोर्डाच्या बैठकीत सादर केल्यानंतर लष्करी अधिकारी व बोर्ड सदस्य यांनी मंजूर करुन अंतिम मान्यतेसाठी पुण्यातील दक्षिण विभाग  प्रधान संचालक कार्यालयामार्फत दिल्ली येथील संरक्षण मंत्रालय अंतर्गत रक्षा संपदा विभागाकडे पाठविला होता. त्यानंतर जागा मिळण्याबाबत खंडेलवाल व सर्व बोर्ड सदस्यांनी डिसेंबर महिन्यात खासदार श्रीरंग बारणे यांच्या समवेत संरक्षण मंत्री निर्मला सितारामन व संबधित अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.अखेर वीज उपकेंद्रासाठी कँटोन्मेंटच्या २८ गुंठे जागेचे बी २ मधून सी मध्ये वर्गीकरण करण्यास भान्यता दिली असून संरक्षण मंत्रालयाच्या धोरणानुसार प्रत्येक फुटास एक रूपया भाडे आकारणी करण्यात येणार आहे. महावितरणकडून एकूण ८९ लाख ४० हजार ८०० रुपये मिळाल्यानंतर जागा हस्तांतर करण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणdehuroadदेहूरोडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड