शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी शहरातील व्यायामशाळांना सेवा शुल्क न देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 15:55 IST

संबंधित मंडळांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने सेवाशुल्क देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय

पिंपरी: शहरातील विविध भागांतील ८२ व्यायामशाळा आहेत. त्या स्थानिक मंडळांना चालविण्यासाठी दिला जात असून, त्यापोटी पालिका दरमहा दोनहजार रुपये सेवाशुल्क देते. मात्र, संबंधित मंडळांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने सेवाशुल्क देण्याची पद्धत बंद करण्याचा निर्णय क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीने सभेत घेतला आहे,महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष तुषार हिंगे होते. सदस्य विकास डोळस, बाबा त्रिभुवन, सागर गवळी, राजू मिसाळ, अपर्णा डोके, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. हिंगे यांनी म्हणाले, पालिकेच्या शहरात एकूण ८२ व्यायामशाळा आहे. त्या सार्वजनिक मंडळ, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठान आणि संस्थांना दरमहा दोन हजार रुपये सेवाशुल्क तत्वावर देण्यात येतात. अनेक मंडळे व संस्था व्यायामशाळा व्यवस्थितपणे चालवित नाहीत. काही व्यायामशाळा बंदच असतात.अनेक ठिकाणी व्यायामाचे साहित्य चोरीला गेले आहे. व्यायामशाळाची दुरवस्था झाली आहे. संबंधितांकडून वीजेचे बिल दरमहा भरले जात नाही.या प्रकाराच्या अनेक तक्रारी क्रीडा विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्याची दखल घेऊन क्रीडा समितीने त्या मंडळांना दरमहा सेवाशुल्क देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीस लाख रूपयांची बचत होणार आहे.ह्णह्ण क्रीडा स्थापत्य विभाग सुरू होणारपालिकेत झोनिपु, उद्यान, बीआरटीएस अशा विभागासाठी स्वतंत्र स्थापत्य विभाग आहेत. मात्र, क्रीडा विभागासाठी स्थापत्य विभाग नसल्याने क्रीडा विभागाची कुंचबणा होत आहे. क्रीडा स्थापत्य विभाग स्थापन करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

........................... 

पीपीपी तत्वावर उद्याने विकसित करणारमहापौर चषक शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनास स्थायी समितीने आज मंजुरी दिली. त्याप्रमाणे क्रीडा समितीनेही त्यास मान्यता दिली आहे. शहरातील नागरिकांना विविध खेळांसाठी सरावासाठी मैदान उपलब्ध व्हावे म्हणून पीपीपी तत्वावर प्रायोजिक तत्वावर छोटी-छोटी मैदाने विकसित केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना घराजवळ मैदान उपलब्ध होणार आहे. तसेच, पालिकेस भाडे मिळणार आहे. हे मैदान पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि पालिका कर्मचाºयांना मोफत असणार आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFitness Tipsफिटनेस टिप्स