शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

दांडीबहाद्दर नगरसेवकांना लगाम

By admin | Updated: April 15, 2017 03:55 IST

भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत पारदर्शक कारभाराचा डंका पिटविण्यास सुरुवात केली आहे. दांडीबहाद्दर नगरसेवकांना लगाम लावण्यासाठी

पिंपरी : भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत पारदर्शक कारभाराचा डंका पिटविण्यास सुरुवात केली आहे. दांडीबहाद्दर नगरसेवकांना लगाम लावण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करू, अशा भाजपा नेत्यांना महापालिका आयुक्तांनी ब्रेक लावला आहे. बायोमेट्रिक हजेरी पद्धतीची तरतूद कायद्यात नसल्याने प्रचलित पद्धतीनुसार हजेरीपत्रकावर नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातील. राज्य सरकारच्या मान्यतेनंतरच थंब इंप्रेशन आणि फेस रीडिंग अनिवार्य करण्यात येईल, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. त्यामुळे बायोमेट्रिक पद्धती नामधारीच रहाणार आहे. राष्ट्रवादीची एकमुखी सत्ता उलथून लावून भाजपाची एकमुखी सत्ता आली आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्वसाधारण सभांना हजर राहणाऱ्या नगरसेवकांची बायोमेट्रिक पद्धतीने थंब इंप्रेशन आणि फेस रीडिंग घ्यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांना शिस्त लावण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारण सभांना हजर राहणाऱ्या नगरसेवकांची बायोमेट्रिक पद्धतीने थंब इंप्रेशन आणि फेस रीडिंग घेण्याचे निश्चित केले. त्याबाबतचा प्रस्ताव भाजप शहराध्यक्षांनी आयुक्त दिनेश वाघमारे यांना दिला. कायदेशीर अडचणनगरसचिवांनी प्रस्तावाची कायदेशीर बाब आणि तांत्रिक व्यवहार्यता तपासली. महापालिका सर्वसाधारण सभा आणि इतर विषय समित्यांचे कामकाज महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार होते. या अधिनियमातील सभा संचलनाच्या जादा नियमामधील तरतुदीनुसार सभांचे आयोजन केले जाते. परंतु, या नियमांमध्ये सभांना उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची हजेरी नोंदविण्यासाठी स्वयंस्पष्ट तरतूद नाही. त्यामुळे सभांना उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची हजेरीपत्रकावर स्वाक्षरी घेऊन उपस्थिती नोंदविण्यात येते. ही पद्धत इतर सर्व महापालिकांमध्ये सर्वमान्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सर्वसाधारण सभांवेळी नगरसेवकांची हजेरी नोंदविताना हजेरीपत्रकावर सही घेण्याऐवजी बायोमेट्रिक पद्धतीने सभेला येताना आणि जाताना थंब इंप्रेशन आणि फेस रीडिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नगरसेवकांची उपस्थिती नोंदविल्यास सभेला निश्चित वेळेत उपस्थित राहणे प्रत्येक नगरसेवकाला अनिवार्य राहील(प्रतिनिधी)हजेरीपत्रकावर सही आवश्यक सद्य:स्थितीत कायदेशीर पेच असल्याने सभांना उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची हजेरीपत्रकावरच सही घेतली जाणार आहे. तीच वैध समजली जाणार आहे. भाजपच्या आग्रहाखातर बायोमेट्रिक पद्धतीने थंब इंप्रेशन आणि फेस रीडिंग यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. सरकारच्या मान्यतेनंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. तोपर्यंत नगरसेवकांना सही करणे आवश्यक आहे.