शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी, दस-याचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 04:59 IST

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर खरेदीला महत्त्व असल्याने ग्राहकांनी गृहप्रकल्पांमध्ये सदनिकांचे बुकिंग केले आहे.

पिंपरी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर खरेदीला महत्त्व असल्याने ग्राहकांनी गृहप्रकल्पांमध्ये सदनिकांचे बुकिंग केले आहे. वाहन खरेदीस इच्छुक असणा-यांनी दुचाकी, चारचाकी वाहनांचे बुकिंग करून ठेवले आहे. दस-याच्या दिवशी ते नवीन वाहन घरी आणण्याचे त्यांचे नियोजन आहे. गृहप्रवेशासाठीही अनेकांनी हा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतरही बाजारपेठेत तेजी आहे.पिंपरी-चिंचवड शहरात विविध भागाातील दुचाकींच्या दालनात अनेकांनी वाहनांचे बुकिंग केले आहे. डाऊन पेमेंट अदा केले आहे. बँकेची कर्ज प्रक्रिया पूर्ण करून सुमारे तीन हजार वाहने आरटीओकडे नोंदणीसाठी आली आहेत. काहींनी आवडता क्रमांक मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दसºयाच्या अगोदर आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंदणी होण्यासाठी काहींचीधावपळ सुरू आहे. वाहनविक्रीच्या दालनात ग्राहकांची गर्दी दिसून येऊ लागली आहे, तर त्यांना विविध वित्तसंस्थांचे कर्ज उपलब्ध करून देणे, आरटीओ कार्यालयाकडे नोंदणीसाठी कागदपत्रे पाठविणे, वाहनाचा विमा भरून घेणे आदी कामांसाठी प्रतिनिधींची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. चारचाकी वाहन खरेदी करणाºया ग्राहकांचीही धावपळ दिसून येत आहे. ग्रुप बुकिंगवर सवलत असल्याने एकत्रितपणे एकाच वेळी दुचाकी खरेदी करणाºयांचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीNavratri 2017नवरात्रौत्सव २०१७