शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Anant Chaturdashi 2022| तयारी गणपती मिरवणूक सोहळ्याची, चापेकर चौकात गर्दी

By विश्वास मोरे | Updated: September 9, 2022 19:13 IST

आत्तापर्यंत केवळ १० गणेश मंडळांनी मिरवणूक द्वारे विसर्जन ....

पिंपरी : चिंचवड परिसरातील गणेशोत्सव मिरवणूक सुरुवात झाली आहे. चापेकर चौकात गणेश भक्तांची गर्दी होऊ लागली आहे. आत्तापर्यंत केवळ १० गणेश मंडळांनी मिरवणूक द्वारे विसर्जन केले. पिंपरी चिंचवड मध्ये घरगुती गणरायाचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी सकाळी पिंपरी चिंचवड शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या जल्लोषात, उत्साह पूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. ''गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..., अशा घोषणा देत ''पुढच्या वर्षी लवकर...'' या अशी आर्जव करीत लाडक्या गणरायाला गणेश भक्तांनी निरोप दिला. 

चिंचवड परिसरातील मोरया गोसावी घाट,  थेरगाव बिर्ला हॉस्पिटल पूल घाट, रावेत घाट येथे गणरायाचे विसर्जन करण्यात आले. मिरवणूक तयारी सुरु

चिंचवड मध्ये पहिला गणपती दुपारी सव्वा तीन वाजता वेतालनगर येथील शिवतेज मित्र मंडळ गणपती  चापेकर चौकात आला. तिथे महापालिका प्रशासनाने स्वागत केले. सायंकाळी सात पर्यंत १० गणेश मंडळे चौकातून पुढे सरकली. महापालिका प्रशासनाने वतीने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ यांनी स्वागत केले. चौकातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अनिरुद्ध बापू संस्थेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. घाटावर बेरीकेट-पवना घाटावर महापालिकेच्या वतीने आरोग्य सेवक, वैद्यकीय सेवक आणि अग्निशमन दलाचे पथक  तैनात करण्यात आली होती. तसेच कृत्रिम हौदही तयार करण्यात आला होता. नदीत गणरायाचे विसर्जन करण्याऐवजी हौदात विसर्जन करावे, असे आवाहन सामाजिक संस्था च्या वतीने करण्यात आले होते.  या आव्हानाला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. पावसाने उघडीत दिल्याने गणेश भक्तांचा उत्साह अपूर्व असल्याचे दिसून आले.  नदीचे पाणी वाढल्याने घाटावर बॅरिकेट लावले होते. उत्साह वाढला-दुपारनंतर गणेश भक्त उत्साह वाढला.  पवना नदी घाटावर घरगुती गणरायाचे विसर्जन केले जात होते. सायंकाळी सहा नंतर मिरवणूक काढण्याची तयारी सुरू झाली. देखावे सजविण्याची लगबग सुरू होती. चिंचवड परिसरातील गणेशोत्सव मिरवणूक सुरुवात झाली आहे. चापेकर चौकात गणेश भक्ताची गर्दी होऊ लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpimpri-acपिंपरी