शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

स्मशान दाखल्यासाठी नगरसेवकाचे पत्र रूढीपरंपरेनुसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 16:31 IST

स्मशान दाखला देण्याबाबत शिफारस पत्र हे रूढी आणि पूर्वपरंपरेनुसार दिले जाते...

ठळक मुद्देडॉक्टराच्या तज्ज्ञ समितीचे पत्र घेऊनच स्मशान दाखला देण्यात यावा, अशी सूचना प्रशासनास

पिंपरी : साठ वयापेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांचा नैसर्गिक मृत्यू झाला की स्मशान दाखल्यासाठी नगरसेवकांचे शिफारस पत्र हे प्रथा परंपरेनुसार चालते, याबाबत कोणतेही कायदेशीर तरतूद केलेली नाही, असे उत्तर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांना दिले आहे.नगरसेवकांच्या शिफारसपत्राचा दुरूपयोग होऊ नये, त्यामुळे साठ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर नगरसेवकाच्या पत्राबरोबरच डॉक्टराच्या तज्ज्ञ समितीचे पत्र घेऊनच स्मशान दाखला देण्यात यावा, अशी सूचना प्रशासनास केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील एखाद्या व्यक्तीस कोणत्याही वैद्यकीय उपचार न करता नैसर्गिकरित्या मृत्यू आल्यास किंवा त्या व्यक्तीचे वय हे साठपेक्षा अधिक असल्यास नागरिकांना स्मशान दाखला देण्यासाठी नगरसेवकांचे शिफारसपत्र ग्राह्य धरले जाते.  त्या शिफारसपत्रावरून महापालिकेकडील दवाखाना, रूग्णालयाकडून अंत्यविधीसाठी स्मशानपास देण्यात येतो. याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी महापालिका प्रशासनास पत्र देऊन माहिती विचारली होती.  स्मशान दाखल्यासाठी नगरसेवकाकडून शिफारसपत्र देण्याविषयीची कायदेशीर तरतूद काय? याबाबत कोणत्या नियमानुसार स्मशान दाखल्यासाठी पत्र दिले जाते, अशी विचारणा केली होती. त्यावर महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी पत्र दिले आहे. ..........................स्मशान दाखला देण्याबाबत शिफारस पत्र हे रूढी आणि पूर्वपरंपरेनुसार दिले जाते. शिफारस पत्र देण्याबाबत कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही. तसेच महापालिका सभा, स्थायी समिती किंंवा कोणत्याही सक्षम समितीचा ठराव उपलब्ध नाही.  त्यामुळे स्मशनदाखला दे्यापूर्वी अथवा देताना मृत व्यक्तीच्या मृत्यू कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, फॉर्म चार व चार अ या नमुन्यामध्ये अथवा डॉक्टरांचा पोस्टमोर्टेम अहवाल घेऊन स्मशान पास देण्यास हरकत नाही.-डॉ. पवन साळवे, (आरोग्य वैद्यकीय अधिकारी)  .................साठ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर नगरसेवकांच्या शिफारस पत्राने स्मशान दाखल देण्यात येतो. मात्र, मृत्यूवरून कौटुंबिक काही वाद झाला. काही अडचण आल्यास शिफारस देणारा नगरसेवक चुकीची माहितीमुळे अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे नगरसेवकाच्या शिफारसपत्राबरोबर डॉक्टरांच्या समितीचा अहवाल घेऊन स्मशान दाखला दिल्यास नगरसेवकांना कोणतही कायदेशीर अडचण येणार नाही. याबाबतची सूचना प्रशासनास केली आहे. -विलास मडिगेरी, (अध्यक्ष, स्थायी समिती महापालिका).

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यू