शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

coronavirus : दिलासादायक ! पिंपरीतील काेराेनाबाधीत तीन रुग्ण झाले ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 18:51 IST

पिंपरी चिंचवडमधील काेराेनाग्रस्त तीन रुग्ण आता बरे झाले असून त्यांना लवकरच घरी साेडण्यात येणार आहे.

विश्वास मोरेपिंपरी :  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केलेल्या उपाययोजना यांमुळे गेल्या 15 दिवसांत पॉझिटिव्ह आढळलेल्या 12 पैकी तीन जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी पहाटे अहवाल आले असून आज आणखी एकदा दुसऱ्यांदा तपासणी साठी घशातील द्रव्याचे नमुने पाठविणार आहेत. त्यानंतर या रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे.

चीनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर देशात ही या विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिंपरी -चिंचवड शहरात बारा मार्चला पहिला रुग्ण सापडला होता. त्यांनतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कडक उपाययोजना केल्या. वैदकीय आणि आरोग्य विभागाचे नियोजन केले. परदेशातून येणाऱ्या आणि आलेल्या नागरिकांवर नजर ठेवली होती. नागरिकांना होम क्वॉरंटाईन केले होते. त्यांच्यावर 112 टीम लक्ष ठेवून आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज एकुण १४१ व्यक्तींचे घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. पैकी १३४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.पिंपरी चिंचवड मध्ये पहिले 3 रुग्ण 11 मार्चला आढळून।आले होते. या तिघांनी पुण्यातील दुबईला गेलेल्या दाम्पत्याबरोबर प्रवास केला होतो. एकाच दिवशी 3 रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ उडाली होती. 

आज अखेर एकुण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १२ आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांचेवर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयांमधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. यातील 3 रुग्णाचे घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते त्याचे अहवाल आज पहाटे आले ते कोरोना निगेटिव्ह आहेत. आज पुन्हा एकदा त्याचे घशातील द्रव्याचे नमुने तपासणी साठी पाठविण्यात येणार आहेत. ते निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. ही मोठी दिलासादायक बातमी आहे. त्यामुळे रुग्णाची संख्या घटून 9 होणार आहे. मात्र त्यासाठी आजच्या अहवालाची वाट पहावी लागणार आहे.

सहा दिवसातएकही रुग्ण नाहीसहा दिवसात एकही कोरोना चा रुग्ण पिंपरी चिंचवड मध्ये सापडलेला नाही. यामुळेच पिपरी चिंचवड मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येत आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, "12 पैकी 3 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी एकदा घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. ही बाब दिलासादायक ठरणार आहे. शहरात 11 मार्चला कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तातडीने उपाययोजना सुरू केल्या. वायसीएम, भोसरीतील महापालिका रुग्णालयात कोरोना साठी कक्ष निर्माण केला. तसेच नागरिकांना या साथीच्या आजाराचे गांभीर्य समजावं यासाठी शहरात प्रबोधन फ्लेक्स लावले. तसेच 15 लाख पत्रकाचे वाटप केले. तसेच पहिल्या टप्प्यात आढळलेल्या संशयितांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी केली, नागरिकांना होम कोराटईन केले. वेळीच उपाययोजना केल्या मुळे कोरोनाचा संसर्ग  टाळण्यात काहीप्रमाणात यश आले आहे. मात्र धोका कमी झालेला नाही. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी बाहेर पडू नये. तसेच हँड वॉश करावा, सामाजिक संपर्क टाळावा. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड