शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Corona virus : पिंपरीत शहरात आतापर्यंत ५४ हजार २३२ जण कोरोनामुक्त; शुक्रवारी ८६२ जण परतले घरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 12:34 IST

शुक्रवारी दिवसभरात ८४३ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले.

पिंपरी : औद्योगिक नगरीत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. तसेच पॉझिटिव्ह रूग्णांचीही संख्या कमी होऊ लागली आहे. शुक्रवारी दिवसभरात ८४३ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, ८६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील १४ आणि पुण्यातील ७ अशा एकूण २१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ४ हजार ०३६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. २ हजार ९२७  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात सामाजिक संसर्गास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाच्या वतीने संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्या आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. आज ४ हजार ०१७ जणांना महापालिकेच्या रुग्णालयांत दाखल केले आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी २ हजार ९२७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ६८ हजार ४३९ वर पोहचली आहे. तर २ हजार ०६२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ४ हजार ०३६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ५ हजार ५५२ झाली आहे.       ...........................   २०६२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत   महापालिकेतील दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. २०६२ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात ८६२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण ५४ हजार २३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.           .....................  मृतांमध्ये वृद्धांची संख्या अधिक    शहरातील १४ आणि पुण्यातील ७ अशा एकूण २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ११०९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला-पुरुष आणि वृद्धांची संख्या अधिक आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकर