शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

Corona virus : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दररोज होणार ४०० स्वॅबची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 3:20 PM

अवघ्या अर्ध्या तासात संशयितांना कोरोनाची लागण झालेली आहे की नाही याची माहिती मिळणार

ठळक मुद्देआरटीपीसीआर स्वॅब टेस्टींग लॅब : महापालिकेच्या इतर रुग्णालयांत आजपासून वापरमहापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे अ‍ॅन्टिजेन किट उपलब्धकोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अशा संशयितांची स्वॅबद्वारे तपासणी

पिंपरी : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत संशयित रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल मोठ्या संख्येने प्रलंबित रहात असलने पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आरटीपीसीआर स्वॅब टेस्टींग लॅब मंगळवारी (दि. ७) कार्यान्वित करण्यात आली आहे. महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक योगेश बहल, नगरसेविका सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, डॉ. प्रवीण सोनी, डॉ. सतीश पाटील, डॉ. मोकाशी आदी या वेळी उपस्थित होते. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे अ‍ॅन्टिजेन किट उपलब्ध झाले आहेत. याद्वारे सुमारे एक लाख कोरोनाची लक्षणे असणारे तसेच कोरोबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी होणार आहे. अवघ्या अर्ध्या तासात संशयितांना कोरोनाची लागण झालेली आहे की नाही याची माहिती मिळणार आहे. कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अशा संशयितांची स्वॅबद्वारे तपासणी होईल. महापालिकेचे फ्रन्टलाईन कर्मचारी, कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉट मधील भाजी विक्रेते, रेशनिंग दुकानदार तसेच ज्या व्यक्तींना अतिजोखमीचे आजार आहेत, अशा व्यक्तींची या किटद्वारे चाचणी होईल. महापालिकेच्या सर्व विभागीय रुग्णालयांमध्ये बुधवारपासून त्याचा वापर सुरू होईल.  

महापौर ढोरे म्हणाल्या, गेल्या आठवड्यात स्वॅब टेस्टींग लॅबकरीता आयसीएमआरची मान्यता मिळालेली होती. त्या माध्यमातुन दररोज ३५० ते ४०० स्वॅब टेस्टींग होणार आहेत. यामुळे संशयित कोरोना रुग्णांचा तपासणी अहवाल प्रलंबित न राहता जलद गतीने प्राप्त होण्यास मदत होईल. अधिकाधिक रुग्णांच्या चाचण्या कमी वेळात आणि कमी खर्चात होण्यासाठी या नव्या अतिजलद चाचणी होईल. १५ ते ३० मिनिटांत त्याचा अहवाल मिळणार आहे. 

नामदेव ढाके म्हणाले, अँटिजेन टेस्टिंग रुग्णांना वरदानच ठरणार आहे. जलद गतीने होणाºया चाचण्यांमुळे अधिकाधिक रुग्णांचं निदान होईल. बाधित रुग्णांची संख्या कदाचित सुरुवातीला जास्त असेल; पण आजाराच्या सुरुवातीलाच निदान झाल्यामुळे रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण आणि ते मृत्युमुखी पडण्याची संख्या मर्यादित होईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडेल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल