पिंपरी : औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा वाढत असून दिवसभरात २० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८८ वर गेली आहे. तर दिवसात ३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यातील बालेवाडी येथील साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ३२ वर पोहोचली आहे. ११६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात सोमवारी दिवसभरात २० जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये १४ पुरुष तर ६ महिलांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये आनंदनगर, भारतनगर, थेरगाव, चिखली, दापोडी, भाटनगर, भोसरी, वडमुख वाडी येथील नागरिकांचा समावेश आहे. तर ३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील ४७२ आणि पुण्यातील ५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत...............................बालेवाडीतील एकाचा मृत्यूमहापालिकेतील रूग्णालयात दाखल असणाºया आणि पुण्यातील बालेवाडी येथील रहिवाशी असणाºया एका वृद्धांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत पुण्यातील १८ आणि पिंपरीतील १४ अशा एकुण ३२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे...............१२६ जणांना डिस्चार्जमहापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सोमवारी १२६ जणांना दाखल केले आहे. तर एनआयव्हीकडे पाठविलेल्या ११६ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच १९८ जणांचे अहवाल प्रलंबित असून, सध्या रुग्णालयामध्ये ५६२ जण दाखल आहेत. तर दिवसभरामध्ये १२६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरामध्ये ३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये आनंदनगर, बौद्धनगर, दत्तनगर, आकुर्डी, सांगवी, किवळे, पिंपळेगुरव, रहाटणी, भोसरी, पिंपळेसौदागर, विजयनगर, दिघी भाटनगर, चिखली, दापोडी, काळेवाडी, वाकड, पिंपरी, आकुर्डी, निगडी, सांगवी, चिंचवडस्टेशन, आंबेगाव आणि मावळ येथील नागरिकांचा समावेश आहे.
Corona virus : पिंपरीत दिवसभरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, २० जण पॉझिटिव्ह, ३४ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 20:33 IST
औद्योगिकनगरीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८८ वर गेली...
Corona virus : पिंपरीत दिवसभरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, २० जण पॉझिटिव्ह, ३४ जण कोरोनामुक्त
ठळक मुद्देदिवसभरामध्ये १२६ जणांना देण्यात आला डिस्चार्ज