शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : नऊ हजारांहून अधिक रुग्ण झाले कोरोनामुक्त पण, प्लाझ्मा दानासाठी कुणी पुढे येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 11:27 IST

कोरोनाच्या विळख्यातून आत्तापर्यंत ९ हजाराहून अधिक रुग्ण बाहेर आले आहेत.

ठळक मुद्देप्लाझ्मा दान करण्याविषयी नागरिकांमध्ये कमालीची भीती व अज्ञान

पिंपरी : शहरात नऊ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. मात्र यापैकी प्लाझ्मा देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. आतापर्यंत केवळ 38 जणांनी प्लाझ्मा दान केले असून त्याचा फायदा 35 अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना झाला आहे. प्लाझ्मा दानाविषयी अद्याप रुग्णांमध्ये आणि नागरिकांमध्ये देखील कमालीची भीती व अज्ञान असल्याने ते स्वयंस्फुर्तीने प्लाझ्मा दान करत नसल्याचे दिसून आले आहे. सध्या प्लाझ्मा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा वापर करता येत नाही. बरे झालेल्या रुग्णांमध्ये असणा-या गैरसमजामुळे ते प्लाझ्मा देण्यास नकार देत असल्याने प्लाझ्मा कमतरता जाणवत आहे. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातून प्लाझ्मा वेगळा केला जातो.  रुग्णाच्या शरिरातील अ‍ॅण्टीबॉडी तसेच विषाणूंबरोबर लढा देण्याचे काम प्लाझ्मा करते. त्यानंतर  अत्यवस्थ किंवा गरज असलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या शरिरात हा प्लाझ्मा सोडला जातो. प्लाझ्माच्या माध्यमातून रुग्णाच्या शरीरात कोरोनाच्या विषाणुबरोबर लढणा-या पेशी तयार होतात. त्यामुळे रुग्ण लवकर यातून बरा होतो. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ३५ कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात आले आहेत. ते उपचार केलेले ३५ रुग्ण बरे झाले आहेत.   

नागरिकांच्या मनातील भीती 

- प्लास्मा दिल्यावर पुन्हा कोरोना होण्याची भीती - रोगप्रतिकारक शक्ती संपून जाईल -   अशक्तपणा येईल-  रक्तातील सर्व पेशी काढून घेतील

रुग्णांमध्ये प्लाझ्माविषयी विनाकारण भीती व अज्ञान आहे. त्याविषयी त्यांच्यात जागरुकतेची गरज आहे. अनेकजण प्लास्मा देण्यास घाबरत आहेत. प्लाज्मा दान केल्याने कोणत्याही प्रकारे नुकसान होत नाही. शरिरातील रोगप्रतिकारक शक्तीला कोणतीही हानी पोहचत नाही. या उलट प्लाझ्मा दान केल्याने आपण एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतो. त्यामुळे कोणताही गैरसमज न बाळगता नागरिकांनी प्लाज्मा दानास पुढे येण्याची गरज असल्याने प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढल्यास त्याचा फायदा अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना होणार आहे. -  डॉ. विनायक पाटील, वैद्यकीय अधिकारी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटल