शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus News : 'माझे कुंटुंब माझी जबाबदारी ' मोहिमेअंतर्गत पिंपरीत १० लाख नागरिकांची तपासणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 19:56 IST

शहराची एकुण लोकसंख्या २४ लाखांच्या जवळपास असुन या लोकसंख्येच्या ४३ टक्के म्हणजेच १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देया मोहिमेसाठी १३४९ सर्व्हेक्षण पथके शहरात कार्यरत

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘माझे कुंटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम शहरभर राबविणेत येत आहे. या मोहिमेसाठी १३४९ सर्व्हेक्षण पथके शहरात कार्यरत असुन त्यांचेमार्फत आजअखेर एकुण ३ लाख एकोण पन्नास हजार कुटुंबातील १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिमे अंतर्गत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्‍याची सुचना राज्य शासनाने दिली असून त्या अंतर्गत गृहभेटी देवून नागरिकांना आरोग्य शिक्षण व त्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे. कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहीम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असुन या मोहिमेसाठी नागरिकांनी स्वतः हुन पुढाकार घेत या मोहीमेला आजपर्यंत उस्फुर्त असा प्रतिसाद दिला आहे. 

पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, 'नागरिकही मनात कोणताही संकोच न ठेवता आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबांची तपासणी करून घेत आहेत. तसेच प्रत्यक्ष गृहभेट देणाऱ्या महापालिकेच्या टीम ला सहकार्य देखील करत असुन ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात मदत होत आहे. शहराची एकुण लोकसंख्या २४ लाख ४ हजाराच्या जवळपास असुन या लोकसंख्येच्या ४३ टक्के म्हणजेच १० लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये ३५ हजार त्र्याऐंशी नागरीक कोमॉर्बिड आढळून आले आहेत. तरी पुढील १० दिवसात उर्वरीत नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याने नागरिकांनी गृहभेटी देणाऱ्या महापालिकेच्या पथकास सहकार्य करावे.''आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ''माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोगयाची माहिती मिळणार आहे. किती नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला ही माहिती मिळणार आहे.''

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकर