शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीतील ‘वायसीएम’चे आधी कौतुक , पण पुरस्कार देताना पडला विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 11:32 IST

कोरोना काळात आसामान्य काम करणाऱ्या कोरोना वारियर्सचा सन्मान

ठळक मुद्देपुण्यातील बारा कोरोना योद्ध्यांचा सन्मान : पिंपरीत चांगले काम करूनही उपेक्षा

पिंपरी : राज्यात कोरोना महामारीच्या काळात असामान्य काम करणाऱ्या डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते १५ आॅक्टोंबरला राजभवन मुबई येथे सत्कार होणार आहे. असामान्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. जाहीर झालेल्या नावांमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या एकाही कर्मचाऱ्यांचे नाव नाही. त्यामुळे राज्य शासनाला वायसीएमच्या कामाचा विसर पडला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.      राज्यातील सर्वच विभागांना या पुरस्कारामध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. राज्यात जेव्हा कोरोनाचा हाहाकार सुरू होता. तेव्हा वायसीएमचा मृत्यूदर हा एक टक्क्यापेक्षाही कमी होता. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच विभागातील रुग्ण हे वायसीएमला दाखल होत होेते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ येथे रुग्णांना मिळाला आहे.       

कोरोनाच्या उपचारासाठी समर्पित सर्व शासकीय रुग्णालय, महापालिकेचे रुग्णालय, खासगी आणि निमशासकीय रुग्णालयांना राज्य शासनाने प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तेव्हापासून पुणे विभागात सर्वाधिक प्लाझ्मा संकलन आणि वितरण करण्याचे काम वायसीएमने केले आहे. वेळोवेळी वायसीएमच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे.एकाही डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्याचे नाव नसल्याने वायसीएमच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत ८२ हजार ५०३ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यातील ७६ हजार ७६३ रुग्ण बरे झाले असून, १ हजार ५०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ९३ टक्के आहे. मृत्यूचे प्रमाण हे १.२७ एवढे आहे.---पुरस्कारांमध्ये पुणे विभाग आघाडीवरपुणे विभागातील १२ कर्मचाऱ्यांना पुरस्कार मिळणार आहे. त्यातील तीन पुणे एनआयव्ही येथील शास्त्रज्ञ आहेत. अमरावती ४, कोकण ५, नाशिक ५, नागपूर ६, औरंगाबाद ६, मुंबई ९, पुरस्कार मिळणाºयांमध्ये डॉक्टर, अधिपरिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी, कक्ष सेवक, सफाई कर्मचारी, आशा सेविका, औषध निर्माण अधिकारी, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटलState Governmentराज्य सरकार