शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्यांची कमी होई ना गर्दी: पिंपरी पोलिसांनी जागेवरच केली २५० जणांची अँटिजेन तपासणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 14:00 IST

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही काही नागरिक घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करत आहे.

पिंपरी : बाजारपेठेत गर्दी कमी होत नसल्याने पोलिसांकडून पिंपरी कॅम्पातील शगुन चौक येथे विनाकारण फिरणाऱ्या २५० नागरिकांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यात सर्वांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे बाजारपेठेत ‘पॉझिटिव्ह’ चर्चा होताना दिसून आली. 

कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही काही नागरिक घराबाहेर पडून नियमांचे उल्लंघन करीत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा देखील उगारण्यात येत आहे. असे असतानाही बेशिस्त नागरिकांची बेफिकीरी कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे पोलिसांकडून बाजारपेठ परिसरात अँटिजन तपासणीचे शिबिर घेण्यात आले. मंगळवारी व बुधवारी हे शिबिर झाले. शगुन चौकात झालेल्या शिबिरात सामान्य नागरिकांची तपासणी करण्यात आली. महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील वैद्यकीय विभागाच्या पथकाने ही तपासणी केली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे आदी या वेळी उपस्थित होते. 

शगुन चौकात वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती. घराबाहेर पडण्याचे कारण पोलिसांकडून विचारण्यात येत होते. तसेच पादचाऱ्यांकडेही विचारणा केली जात होती. समाधानकारक उत्तर न देणाऱ्या वाहनचालक व पादचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. यात महिला, जेष्ठ नागरिकांचीही संख्या मोठी होती. काही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे चाचणी करून घेतली. काही जणांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर काही वाहनचालकांनी आल्या मार्गाने परत जाणे पसंत केले. 

एक पोलीस पाॅझिटिव्हपिंपरी पोलीस ठाण्यात झालेल्या शिबरात अधिकारी व कर्मचारी असे एकूण १०० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात एका पोलिसाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याने त्यांना गृहविलगीकरणाचा सल्ला देण्यात आला. 

पिंपरी कॅम्पात गर्दी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाचा संसर्ग रोखण्याबाबत जनजागृती केली जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तMarketबाजार