शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीत अडीच महिन्यात कोरोनाचे ‘द्विशतक’, एका दिवसात २२ जणांना संसर्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 20:02 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यातही कोरोनाचा प्रादूर्भाव लागला वाढू

ठळक मुद्देदाट लोकवस्ती असणाऱ्या काळेवाडी आणि रूपीनगर परिसरात सर्वाधिक रूग्ण कोरोनामुळे आजपर्यंत १२ जणांचा मृत्यू

पिंपरी :  औद्योगिक नगरीतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने अडीच महिन्यात पॉझिटिव्ह रूग्णांनी सव्वा दोनशेचा आकडा पार केला आहे. कोरोनाचा झोपडपट्टीत शिरकाव झाला असून एका दिवसात आनंदनगर, चिंचवड येथील १७ जणांसह शहरातील एकुण बाविस जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजअखेर २२५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पिंपरी -चिंचवड परिसरात कोरोनाचा वेग कमी होता. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात हा वेग आता वाढू लागला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्यातही कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागला असून सुरूवातील पिंपरीतील खराळवाडीत पॉझिटिव्ह रूग्ण आढळले होते. त्यानंतर दाट लोकवस्ती असणाऱ्या काळेवाडी आणि रूपीनगर परिसरात सर्वाधिक रूग्ण आढळले होते. त्यानंतर आता चिंचवडस्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीत कोरोना पसरू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी आनंदनगर येथील झोपडपट्टीत कोरोनाचा रूग्ण सापडल्यानंतर हा भाग सील केला होता. त्यामुळे संबंधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीत तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा रिपोर्ट आज आला असून त्यात १७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर भोसरी, येरवडा, येथील पाच जणांचाही रिपोर्ट पॉझिट्व्हि आले आहेत. त्यामुळे सक्रिय रूग्णांची संख्या ८६ वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आजपर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून त्यात पुण्याचे आठ आणि पिंपरी-चिंचवडमधील चार जणांचा समावेश आहे........................कोणत्या प्रभागात रूग्ण वाढताहेत, आणि कोणत्या नाहीमहापालिकेच्या आठही प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये प्रभागातील काही भागात रुग्ण नाहीत. पिंपरीगाव, खराळवाडी, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी, आकुर्डी, चिंचवडस्टेशन, मोहननगर, चिंचवडमधील पिंपळेगुरव, सौदागर, निलख, जुनी, नवी सांगवी, वाकड, पुनावळे, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, किवळे-विकासनगर आणि भोसरीतील भोसरी, दिघी, मोशी, च-होली, रुपीनगर, चिखली, संभाजीनगर शहराच्या  जवळपास अशा संपुर्ण भागात आजपर्यंत कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. मात्र, रावेत, चिंचवडगाव, निगडी, प्राधिकरण, यमुनानगर, निगडी गावठाण अशा काही भागात रुग्ण सापडले नाहीत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर