शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी महापालिका रुग्णालयांमध्ये कोरोनाला मात देण्यासाठी अहोरात्र लढताहेत 'कोरोेना योद्धे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 16:14 IST

पिंपरीतील रुग्णालयात तत्पर सेवा,अपेक्षा सौजन्याची!

ठळक मुद्देभोसरीत आपुलकीची दिलासादायक स्थिती

युगंधर ताजणे/तेजस टवलारकर पिंपरी : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना अनेक रुग्णालयांमध्ये मात्र डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी योद्धे बनून कोरोनाशी संघर्ष करीत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसह सर्वांनाच तत्पर सेवा मिळत असून, कर्मचाºयांनी रुग्ण आणि नातेवाईकांशी सौजन्याने वागावे, अशी अपेक्षा रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. पालिकेच्या रुग्णालयांपैकी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरी येथील रुग्णालयात लोकमत च्या प्रतिनिधींनी पाहणी केली. त्यात काही बाबी समोर आल्या.  रुग्णालयात आलेल्या रुग्णाला सेवा मिळाली पाहिजे, या भावनेने मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून तपासणी केली जात आहे. कोरोना रुग्णांसाठी या रुग्णालयांमध्ये वेगळे वॉर्ड तयार केले असून, त्या ठिकाणी स्वॅब घेतले जात आहेत. तसेच रुग्णांवर उपचार देखील केले जात आहेत. वायसीएम रुग्णालयाच्या परिसरातील डॉक्टर, रुग्ण, नातेवाईक यांच्याशी संवाद साधला असता, या ठिकाणी सेवा तातडीने दिली जाते. तसेच सरकारी सूचनांचे पालन करून रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, काही कर्मचारी रुग्ण आणि नातेवाईकांसोबत उद्धट बोलत असल्याचे निदर्शनास आले. कुठलीही माहिती विचारायला गेल्यास अरेरावीची भाषा, आणि माहिती देण्यास टाळाटाळ असेही काही ठिकाणी जाणवले. नातेवाइकांनी विनंती करूनदेखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचाही प्रकार दिसून आला. कोरोनाच्या संसगार्ने परिस्थिती गंभीर असताना कर्मचाºयांच्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे रुग्णांचे नातेवाइक नाराजी व्यक्त करीत आहेत. आम्ही कोरोनाशी लढायचं का कर्मचाºयांचं ऐेकून घ्यायचं? असेही काही नातेवाईकांनी बोलून दाखवले. त्यामुळे कर्मचाºयांनी सौजन्य दाखवावे, अशी अपेक्षा आहे. रुग्णालयाच्या परिसरात सतत रुग्ण येतात. त्यामुळे येथील परिसर स्वच्छ ठेवण्यात येत आहे. वारंवार निजंर्तुकीकरण केले जाते. मास्क नसेल, तर प्रवेश दिला जात नाही.

अधिकाºयांनी दखल घ्यावी४\पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज २०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे. केवळ शहरच नव्हे तर पुणे, पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतून, गावातून रुग्ण तपासणीसाठी वायसीएममध्ये येत आहेत. पहिल्यांदाच रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना कोविड वॉर्ड सापडणे, रजिस्टेÑशन, प्राथमिक तपासणी, स्वॅब टेस्ट, त्याचा अहवाल घेणे, त्यानंतर प्रत्यक्षात कोविड वॉर्डात जाणे यांसारख्या प्रक्रियेबद्दल फारशी माहिती नसते. 

अशावेळी ते एखाद्या वॉर्डाच्या बाहेर असणाºया कर्मचाºयांकडे विचारणा करतात. मात्र, त्यांच्याकडून नकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना रुग्णाला कुठे घेऊन जायचे हे समजत नाही. उपचारापूर्वीच अरेरावीची भाषा वापरल्याने नातेवाइकांचा गोंधळ आणखी वाढत आहे. याविषयी कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न त्यांना पडला आहे. संबंधित विभागाचे अधिकारी कोण? याबद्दलदेखील काहीच माहिती नसल्याने त्यांना तक्रार करणे अवघड झाले आहे, असे ह्यलोकमतह्णच्या प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत आढळून आले. 

रुग्णालयाकडून घरी सोडण्याची व्यवस्थारुग्णालयात आलेला प्रत्येक रुग्ण हा कोरोनाचाच आहे, अशा अविभार्वात कर्मचारी वागत आहेत. वास्तविक नातेवाईक सुरक्षित अंतर ठेवून बोलत असले, तरी त्यांच्याशी उर्मटपणाने बोलले जात आहे. सध्या वायसीएम रुग्णालयात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण दाखल असून, त्याचा ताण रुग्णालय प्रशासनावर आहे. परंतु, रुग्णांना बरे करण्यासाठी येथील डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी शथीर्चे प्रयत्न करीत आहेत. रुग्णांना तत्परतेने सेला मिळत असली, तरी कर्मचाºयांनी सौजन्याने वागावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रुग्ण कोरोनामुक्त झाल्यावर त्यांना घरी सोडले जाते. काही रुग्णांना घरी जाण्यासाठी स्वत:ची व्यवस्था नसते. अशा रुग्णांना घरी सोडण्याचे कामदेखील वायसीएमची यंत्रणा करीत आहे. दाखल असलेल्या रुग्णांना भेटता येत नसले, तरी त्यांच्या घरच्यांनी काही साहित्य, वस्तू आणून दिल्या तर रुग्णांना त्यांचे साहित्य दिले जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर