शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी ५६ जणांना कोरोनाची बाधा; एकूण रुग्णसंख्या ८४३ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:25 IST

दिवसभरात रुग्णालयात २३२ दाखल; नऊ जण कोरोनामुक्त

ठळक मुद्देमहापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मंगळवारी २३२ जणांना केले दाखल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून मंगळवारी दिवसभरात ५६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८४३ वर गेली आहे. तर नऊ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जळगाव येथील एका ४५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या ३३ वर पोहोचली आहे.औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात मंगळवारी दिवसभरात एकूण ५६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये ३३ पुरुष, तर २३ महिलांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये कस्पटे वस्ती वाकड, अजंठानगर, खंडोबामाळ भोसरी, आनंदनगर, काळभोरनगर, साईबाबानगर चिंचवड, दापोडीतील गुलाबनगर, पवारवस्ती तसेच सिद्धार्थनगर, पाटीलनगर चिखली, बौध्दनगर, नाणेकर चाळ पिंपरी, जुनी सांगवी, बेलठिकानगर थेरगाव, वाकड, गुरुदत्त कॉलनी वाल्हेकरवाडी, नवी सांगवी, नढेनगर काळेवाडी, दिघी, विनायकनगर पिंपळे निलख, शाहूनगर चिंचवड, पिंपरीगाव, आदित्य बिर्ला कॉलनी थेरगाव, बोपोडी, जळगाव व हडपसर येथील नागरिकांचा समावेश आहे.महापालिकेच्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात आज २३२ जणांना दाखल केले आहे. तर एनआयव्हीकडे पाठविलेल्या ५९ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तसेच ३६२ जणांचे अहवाल प्रलंबित असून, सध्या रुग्णालयामध्ये ७३१ जण दाखल आहेत. तर दिवसभरामध्ये ६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरामध्ये नऊ जण कोरोनामुक्त झाले आहेत. लिंकरोड पिंपरी, जुनी सांगवी, जयभवानीनगर दापोडी, इंदिरानगर चिंचवड, आनंदनगर चिंचवड, महात्मा फुलेनगर, भाटनगर, समतानगर नवीसांगवी, परंडवाडी, शिरुर व आंबेगाव येथील रुग्णांना रुग्णालयातून मंगळवारी घरी सोडण्यात आले.  आजपर्यंत ४८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत महापालिका हद्दीतील रहिवासी असलेल्या १४ रुग्णांचा तर महापालिका हद्दीबाहेरील रहिवासी असलेल्या १९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर