पिंपरी : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असून दिवसभरात १०१२ रूग्ण आढळले असून शहरातील २४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर दिवसात २६६ जण कोरोनामुक्त झाले असून १ हजार ५१३ जणांना डिस्चार्ज दिला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून दिवसभरात १८०१ जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करून असून एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी ७५७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या २६ हजार ११८ पोहोचली आहे. तर १ हजार ७०३ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. १ हजार ५१३ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ४ हजार १७५ झाली आहे.कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही अधिक असून दिवसभरात २६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकुण १७ हजार ६७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील २१ आणि इतर भागातील ३ अशा एकुण २४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात वृद्धांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत ४४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Corona virus : पिंपरी चिंचवड शहरात एका दिवसात आढळले १०१२ रूग्ण; २४ जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 21:27 IST
दिवसात २६६ जण कोरोनामुक्त झाले असून १ हजार ५१३ जणांना डिस्चार्ज
Corona virus : पिंपरी चिंचवड शहरात एका दिवसात आढळले १०१२ रूग्ण; २४ जणांचा बळी
ठळक मुद्देआजपर्यंत शहरातील एकुण १७ हजार ६७३ जण झाले आहेत कोरोनामुक्त