शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर आदळला घरावर; थरकाप उडवणारा प्रसंग, तळवडे येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 06:36 IST

निगडी-तळवडे रस्त्यावर गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात एक कंटेनर उलटला. तर दुसरा कंटेनर रस्त्यालगतच्या घरावर आदळला. या घटनेमुळे घरात झोपलेल्या व्यक्तींचा...

तळवडे : येथील निगडी-तळवडे रस्त्यावर गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झालेल्या अपघातात एक कंटेनर उलटला. तर दुसरा कंटेनर रस्त्यालगतच्या घरावर आदळला. या घटनेमुळे घरात झोपलेल्या व्यक्तींचा थरकाप उडाला. अपघातानंतर तळवडेपासून गणेशनगरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.तळवडे येथील कहार माथा येथे भरधाव वेगातील कंटेनर (एम.एच. २० इ.जी. १४८८) अचानक उलटला. त्यानंतर त्यापाठोपाठ येत असलेल्या (एच.आर. ५५ एक्स २७३४) समोरील कंटेनरचा अंदाज न आल्याने त्याचा गोंधळ उडाला. अचानक ब्रेक दाबल्याने मागून आलेला कंटेनर रस्त्यालगत असलेल्या लक्ष्मण हगवणे यांच्या घराच्या दिशेने वळाला. वेग नियंत्रणात न आल्याने या कंटेनरची हगवणे यांच्या घराच्या दर्शनी भागास धडक बसली. यामुळे घराला मोठा हादरा बसल्याने घरातील व्यक्ती भयभीत झाले. यामध्ये घराच्या दर्शनीभागाचे नुकसान झाले.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक पंकज भालेकर व प्रवीण भालेकर यांनी त्याठिकाणी धाव घेतली. कंटेनर रस्त्यातच आडवा पडल्याने एक लेन बंद झाली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागून वाहतूककोंडी झाली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर्स बाजूला घेण्यात आले आणि तासाभराने वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.हा अपघात चालकाचे वेगावर नियंत्रण नसल्याने झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहनचालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :Accidentअपघात