शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

बांधकाम मजूर सभेतर्फे वाकडेवाडीत निदर्शने; सुरक्षा मानकांच्या अंमलबजावणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 13:34 IST

बांधकामाच्या साईटवर सुरक्षा मानकांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी बांधकाम मजूर सभेच्या वतीने वाकडेवाडी येथील कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयावर सोमवारी सकाळी निदर्शने करण्यात आली़ 

ठळक मुद्देपुणे हे आशिया खंडातील सर्वाधिक सदनिका (फ्लॅट) निर्मिती केंद्र अपघाताला कारणीभूत असणारी परिस्थिती बदलण्याच्या प्रयत्नासाठी पुन्हा होणार बैठक

पुणे : बांधकामाच्या साईटवर सुरक्षा मानकांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी बांधकाम मजूर सभेच्या वतीने वाकडेवाडी येथील कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयावर सोमवारी सकाळी निदर्शने करण्यात आली़ पुणे हे आशिया खंडातील सर्वाधिक सदनिका (फ्लॅट) निर्मिती केंद्र आहे. स्वाभाविकच देशभरातून बांधकाम कामगार येथे रोजगारासाठी येतात . परंतु बांधकामाच्या या प्रचंड वेगात व पसार्‍यात कामाच्या व राहण्याच्या ठिकाणच्या दुरवस्थेला त्यांना सामोरे जावे लागते. कामाच्या व राहण्याच्या ठिकाणची केवळ आबाळ सहन करणे इतक्या पुरतीच ही परिस्थिती सीमित न राहता कामगारांविषयीची ही बेफिकिरी प्राणघातक ठरत आहे. १० दिवसांपूर्वी सिंहगड रस्त्यावरील बांधकाम साईटवरील अपघातात मृत्यूमुखी पडलेले ३ कामगार हे त्याचेच बळी आहेत. म्हातारी मेल्याचेही दु:ख आहे आणि अपघातांचा काळही अधिक सोकावू नये. म्हणून बांधकाम साईटवर सुरक्षा मानकांची अंमलबजावणी करावी, अपघातांना आळा घालावा या मागणीसाठी कामगार उपायुक्त कार्यालयावर ही निदर्शने करण्यात आल्याचे नितीन पवार यांनी सांगितले़ 

 

कामगार संघटनांचेही अपयशइमारत नियमन रोजगार कायद्याच्या शर्ती नियम आहेत़ तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अपघात कमी होण्याऐवजी वाढत चालले आहे़ हे केवळ कामगार उपायुक्त कार्यालयाचे अपयश नसून कामगार संघटनांचेही अपयश असल्याचे नितीन पवार यांनी सांगितले़ बांधकाम मजूर सभेच्या शिष्टमंडळाशी सहायक कामगार आयुक्तांनी चर्चा केली़ हा विषय गंभीर आहे़ अपघात घडल्यानंतर त्याची चौकशी करण्याऐवजी अपघात होऊच नये, यासाठी अपघाताला कारणीभूत असणारी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा बैठक घेण्याचे यावेळी ठरविण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले़ 

टॅग्स :agitationआंदोलनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड