शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम कोसळून तीन मजूरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 01:33 IST

पिंपळे गुरवची दुर्घटना : विविध रुग्णालयांत पाच जखमींवर उपचार

पिंपरी : पिंपळे गुरव येथे नदीपात्रालगत शिवमंदिराभोवती सभामंडप उभारणीचे दगडी काम सुरू असताना, दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक बांधकाम कोसळले. या दुर्घटनेत दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडून तीन मजुरांचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. ५ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर वायसीएम, तसेच औंध सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये मनतोष संजीव दास (वय ३०, रा. कामगार वसाहत, पिंपळे गुरव), प्रेमचंद शिबू राजवार (वय ३५, कामगार वसाहत) या कामगारांचा समावेश आहे. सिद्धम्मा मानसप्पा पुजारी (वय ३०, रा. गोपीचाळ, खडकी) या कामगार महिलेचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. शामोन सरदार (वय २८, रा. वैदुवस्ती) कृष्णा पवार, कमलेश कांबळे, आयप्पा मल्या सुभंड हे कामगार जखमी झाले आहेत. त्या दोघांवर पिंपरीतील वायसीएममध्ये उपचार सुरू आहेत. तर शामोन सरदार या कामगाराला कमरेला मुका मार लागला असून, त्याच्यावर औंध सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निलम्मा शंकरप्पा पुजारी या महिलेच्या डोक्याला आणि हाताला मार लागला आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तातडीने मदतकार्यासाठी घटनास्थळी धावून गेले. अग्निशामक दलाचे अधिकारी किरण गावडे व त्यांच्या पथकाने दगडाच्या ढिगाºयाखालील मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. रुग्णवाहिकांमध्ये टाकून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. घाईगडबडीने दुर्घटना

पवना नदीपात्रालगत शिवमंदिर बांधण्यात आले आहे. मंदिराच्या पुढे सभामंडप उभारणीचे काम सुरू होते. दुपारच्या जेवणाच्या सुटीनंतर अडीचला पुन्हा काम सुरू झाले. सुमारे ४० कामगार या परिसरात काम करीत होते. २० फूट उंचीचा, तसेच २० बाय ३० आकाराचा सभामंडप उभारण्यात येत होता. पाषाणाचा काळा दगड वापरून नक्षीकाम केले जात होते. आधारासाठी लाकडी वासे लावले होते. वजन न पेलल्यामुळे हे दगडी बांधकाम अचानक कोसळले. मोठा आवाज झाला. काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले. घाई-गडबडीत काम केल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.चिमुकला बचावलादगडांवर कोरीव काम करणाºया कारागिरांच्या बाजूला सात वर्षांचा चिमुकला खेळत होता. दगडी बांधकाम कोसळून त्या ठिकाणी मोठा आवाज झाला. प्रचंड धूळ उडाली. त्या वेळी चिमुकल्याने लगेच तेथून पळ काढला. तो या दुर्घटनेतून बचावला आहे. तो जुन्या मंदिराजवळ खेळत असलेल्या ठिकाणी असलेल्या लोखंडी कमानीवर दगड कोसळले. त्यात ही लोखंडी कमान वाकली. दैव बलवत्तर म्हणून चिमुकला बचावला, अशीच प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींच्या तोंडून व्यक्त झाली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड