शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक आजाराबाबत एकत्रित पावले उचलावीत - डॉ. हमीद दाभोलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:14 IST

मानसिक आजारी व्यक्तींच्या पालकांनी एकत्रित येऊन पावले उचलण्याची गरज आहे. ‘मीच का?’ ऐवजी ‘मी का नाही?’ असा दृष्टिकोन ठेवल्यास सामाजिक चित्र बदलेल, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.

पुणे  - मानसिक आजारी व्यक्तींच्या पालकांनी एकत्रित येऊन पावले उचलण्याची गरज आहे. ‘मीच का?’ ऐवजी ‘मी का नाही?’ असा दृष्टिकोन ठेवल्यास सामाजिक चित्र बदलेल, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले.स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशनचे (सा) अध्यक्ष अमृतकुमार बक्षीलिखित व कल्याणी गाडगीळ अनुवादित ‘मानसिक आजार : पालकांसाठी मार्गदर्शिका’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके आणि डॉ. विद्याधर वाटवे या वेळी उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर अध्यक्षस्थानी होते.मानसिक आजारांविषयी सामाजिक परिस्थिती सांगताना डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘‘अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे मानसिक आजारी व्यक्ती उपचारांपासून वंचित राहतात. त्यांना उपचार मिळण्यास उशीर होतो. अंधश्रद्धेची समस्या केवळ भारतातच नाही तर ती जागतिक आहे. त्यामुळेच मानसिक आजारांबाबत सर्वच देश विकसनशील आहेत.’’डॉ. लुकतुके म्हणाले, ‘‘ हे पुस्तक अतिशय समर्पक, संक्षिप्त व विश्वसनीय आहे. प्रत्येक पालकाने जरुर वाचावे.’’ डॉ. वाटवे म्हणाले, की पुस्तकातील सर्व माहिती विश्वसनीय आहे. मी स्वत: प्रत्येक पालकाला हे पुस्तक घेण्यास सांगेन.अध्यक्षीय भाषणात विजय बाविस्कर म्हणाले, ‘‘मानसिक आजाराविषयी जनजागृती होण्याची गरज आहे. यासाठी प्रसारमाध्यमांनी पुढाकार घ्यायला हवा.’’पुस्तकाच्या अनुवादिका कल्याणी गाडगीळ यांनीही या प्रसंगी पालकांच्या भावनिक व व्यावहारिक समस्या व्यक्त केल्या.‘सा’चे उपाध्यक्ष अनिल वर्तक, विश्वस्त व माजी अध्यक्ष यशवंत ओक, सहकारी मिलिंद भालेकर, याच पुस्तकाचा हिंदी अनुवाद करणाऱ्या प्रभा शेटे, मानसशास्त्रज्ञ अर्चना राठोड यांनीही या प्रसंगी पुस्तकाविषयी आपले अनुभव व विचार व्यक्त केले.‘सा’च्या खजिनदारस्मिता गोडसे यांनी स्वागत केले. केंद्रप्रमुख सारिका चांडक यांनी आभार मानले. कादंबरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.एका मुलीचा पालक म्हणून ज्या कठीण परिस्थितीतून गेलो, त्यातून मी खूप काही शिकलो. २५ वर्षांहूनही अधिक वर्षात मला मिळालेले अनुभव व ज्ञान मी ज्या पालकांपर्यंत पोहोचून त्यांच्या बरोबर वाटण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत या पुस्तकाद्वारे पोचण्याचा माझा प्रयत्न आहे. अज्ञानामुळे मी ज्या चुका केल्या, त्या टाळण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल.- अमृतकुमार बक्षी, लेखक

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या